वृद्ध मालकाला १३ कोटीची फसवणूक करणाऱ्यांना दोन वर्षाची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 10:04 PM2019-03-06T22:04:48+5:302019-03-06T22:06:08+5:30
सत्र न्यायालयाचा निकाल; आर्थिक गुन्हा अन्वेषणचे प्रकरण
मुंबई - एका ८५ वर्षाच्या जेष्ठ नागरिकाकडे काम करीत असताना खोटी कागदपत्रे बनवून त्यांचे तब्बल १३ कोटीच्या मालमत्तेची लुबाडणूक करणाºया दोघा कामगारांना दोन वर्षाची शिक्षा झाली आहे. बेहराम परडीवाला (वय ६०) व मिनय युसुफ पटेल (३७) अशी त्यांची नावे आहेत. सत्र न्यायालयााने नुकताच हा निकाल दिला आहे. आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने या प्रकरणाचा तपास केला होता.
चर्चगेट परिसरात रहात असलेल्या ८५ वर्षाच्या शाबान तनवाला यांच्याकडे परडीवाला हा अकाउंटं म्हणून तर पटेल हा सहाय्यक म्हणून काम करीत होता. तनवाला यांचा भाऊ रमजान व बहिण कुलसुम यांचे काही वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर त्यांच्या घराची देखभाल ते करीत होते. २०११ मध्ये दोघांनी बनावट कागदपत्रे बनवून त्यांच्याकडून जबरदस्तीने स्वाक्षरी घेतली. याबाबत २०१५ मध्ये आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने तत्कालिन वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह घाटगे यांनी या प्रकरणाचा तपास करुन दोघा विरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.