भाईंदरमध्ये दोन दिवसात दोन तरुणांनी केल्या आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 18:06 IST2019-08-26T18:04:35+5:302019-08-26T18:06:15+5:30
आत्महत्येमागील कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

भाईंदरमध्ये दोन दिवसात दोन तरुणांनी केल्या आत्महत्या
मीरारोड - भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन दिवसात दोन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहे. या दोन्ही तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले असून आत्महत्येमागील कारण अजून स्पष्ट झालेले नाही.
पहिला मृतदेह रविवारी भाईंदर - नायगाव दरम्यानच्या खाडीवरील रेल्वे पुलावर गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत मिळाला. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव राजेश संतराम यादव (२१) असं आहे. त्याची ओळख पटली असली तरी त्याचे नातलग अजून आलेले नाहीत.
तर दुसऱ्या घटनेत मिरारोडच्या रामदेव पॅराडाईसमधील एका दुकानात तरुणाने आत्महत्या केली आहे. तरुणाचे नाव रविराज हरेश खाप (२४) असे आहे. भाजीविक्री करणारा असून दुकानातच तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आज सोमवारी आढळून आला. दोघांनी आत्महत्या केल्याचे करण अद्यापही स्पष्ट झालेले नसून नवघर पोलीस पुढील तपास करत आहेत.
भाईंदर खाडीच्या कठड्याला असलेल्या लोखंडी पाईपला गळफास घेऊन तरुणाने केली आत्महत्या https://t.co/mD82AatBXl
— Lokmat (@MiLOKMAT) August 26, 2019