रिक्षा स्टॉपजवळ लघुशंका केल्यावरुन जमावानं दोन तरुणांना धू धू धूतलं

By रवींद्र देशमुख | Published: July 8, 2023 06:13 PM2023-07-08T18:13:01+5:302023-07-08T18:13:21+5:30

यातील जखमी दोघे हे अशोक चौकाकडे कामाच्या निमित्ताने गेले होते.

Two youths were thrashed by the mob after suspicions were raised near the rickshaw stop | रिक्षा स्टॉपजवळ लघुशंका केल्यावरुन जमावानं दोन तरुणांना धू धू धूतलं

रिक्षा स्टॉपजवळ लघुशंका केल्यावरुन जमावानं दोन तरुणांना धू धू धूतलं

googlenewsNext

रवींद्र देशमुख / सोलापूर

सोलापूर : रिक्षा स्टॉपजवळ लघुशंका केल्याच्या किरकोळ कारणावरुन पाचजणांनी मिळून दोघा तरुणांना लाथाबुक्क्या, काठीनं , बेल्टने मारहाण करुन जखमी केले. अशोक चौक मस्तानी हॉटेल शेजारी शुक्रवारी ही घटना घडली. निखिल पोपट डुकरे (वय- २०) व सुजल नागेश भांडेकर (वय १९, रा. बुधवार पेठ, वडार गल्ली, सोलापूर) असे जखमी तरुणांचे नाव आहे.

यातील जखमी दोघे हे अशोक चौकाकडे कामाच्या निमित्ताने गेले होते. तेथे हॉटेल मस्तानी, रिक्षा स्टॉपजवळ लघुशंका केल्याच्या कारणावरुन जखमींना प्रसाद उर्फ पिंटू गायकवाड याच्यासह पाचजणांनी बेदम मारहाण करुन जखमी केले. यामध्ये दोघांच्याही डोक्याला, छातीला , बरगडीला मार लागला. ते स्वत: शासकीय रुग्णालयात दाखल झाले. उपचार काळातच दोघेही पळून गेले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.

Web Title: Two youths were thrashed by the mob after suspicions were raised near the rickshaw stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.