मस्जिदीसमोर भीक मागायची महिला; पोलिसांनी पाठलाग केला अन् सत्य समजताच हैराण झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 07:23 PM2023-01-26T19:23:26+5:302023-01-26T19:23:42+5:30

मागील वर्षी ६ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या काळात १५९ भिकाऱ्यांना अटक केली होती. भीक मागणे हा सामाजिक गुन्हा आहे.

UAE: Woman beggar arrested in Abu Dhabi found with luxury car, large amount of money | मस्जिदीसमोर भीक मागायची महिला; पोलिसांनी पाठलाग केला अन् सत्य समजताच हैराण झाले

मस्जिदीसमोर भीक मागायची महिला; पोलिसांनी पाठलाग केला अन् सत्य समजताच हैराण झाले

googlenewsNext

संयुक्त अरब अमीरातमध्ये भीक मागणे हा गुन्हा आहे. परंतु त्याठिकाणी भीक मागणाऱ्या एका महिलेचे असं प्रकरण समोर आले ज्यामुळे अबू धाबी पोलीस हैराण झाली आहे. पोलिसांनी एका भिकारी महिलेला बेड्या ठोकल्या आहेत जिच्याकडे एक लग्झरी कार आणि कोट्यवधीची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही महिला रोज मस्जिदीसमोर भीक मागत होती आणि घरी लग्झरी कारमधून जायची. जेव्हा एका व्यक्तीला महिला भीक मागताना संशय आला तेव्हा त्याने पोलिसांना ही माहिती दिली. 

खलीज टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, मस्जिदीसमोर भीक मागणाऱ्या महिलेवर अबू धाबीच्या एका रहिवाशाला संशय आला. त्याने पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या महिलेवर पाळत ठेवली तेव्हा धक्कादायक चित्र समोर आले. महिला दिवसभर शहरातील वेगवेगळ्या मस्जिदीसमोर भीक मागत होती. भीक मागितल्यानंतर ती खूप दूर अंतरावर चालत जात होती. 

पोलिसांनी जेव्हा या महिलेचा पाठलाग केला तेव्हा तिच्याकडे आलिशान महागडी लग्झरी कार असल्याचं समोर आले. जी कार चालवून ती महिला भीक मागून घरी जात होती. पोलिसांनी जेव्हा त्या महिलेला पकडले तेव्हा तिच्याकडे खूप रोकड सापडली. ती पोलिसांनी जप्त केली. महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून कठोर कारवाई केली आहे. 

अबू धाबी पोलिसांनी सांगितले की, मागील वर्षी ६ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या काळात १५९ भिकाऱ्यांना अटक केली होती. भीक मागणे हा सामाजिक गुन्हा आहे. जो कुठल्याही समाजाच्या सभ्यतेवर परिणामकारक आहे. भीक मागणे समाजात एक असभ्य काम आहे. यूएईमध्ये हा गुन्हा आहे. भिकारी फसवणूक करतात आणि लोकांच्या चांगलेपणाचा फायदा उचलून त्यांना लुटत असतात. यूएईत भीक मागणे गुन्हा असून त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. भीक मागणाऱ्या व्यक्तीला ३ महिने जेल आणि ५ हजार दिरहम(१ लाख ११ हजार रुपये) दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. जर कोणी व्यक्ती संघटित स्वरुपात टोळी बनवून भीक मागत असेल तर त्यांना ६ महिने आणि १ लाख दिरहम(२२ लाख १७ हजार) दंड आकारला जातो. अबू धाबीत पोलिसांनी सार्वजनिक सुरक्षा आणि भीक मागण्याच्या गुन्ह्यापासून मुक्ती मिळावी यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. 

Web Title: UAE: Woman beggar arrested in Abu Dhabi found with luxury car, large amount of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.