धक्कादायक! पोलिसवाल्यानेच ५० महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवले; घड्याळ, चार्जर, चष्म्यातही बसवला होता गुप्त कॅमेरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 02:06 PM2021-11-04T14:06:42+5:302021-11-04T14:07:36+5:30
UK Crime News : कॉर्बेलने २०१७ ते २०२० दरम्यान ५१ महिला आणि मॉडल्ससोबत ऑनलाइन डेटींग साइट्सच्या माध्यमातून संवाद वाढवला.
एका ब्रिटीश पोलीस अधिकाऱ्याने (British Police Officer) गुप्तपणे ५० पेक्षा जास्त मॉडल्स महिलांचे अश्लील फोटो काढले आणि व्हिडीओही रेकॉर्ड (Nude Video and Photos) केले. यासाठी त्याने सीक्रेट कॅमेरांचा (Secret Camera) वापर केला. याप्रकरणी झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टात वकिलांनी सांगितलं की, तो सेक्स अॅडिक्ट (Sex Addict) होता.
'मिरर यूके'च्या वृत्तानुसार, या ४० वर्षीय पोलीस अधिकाऱ्याचं नाव नील कॉर्बेल (Neil Corbel) आहे. कॉर्बेलने २०१७ ते २०२० दरम्यान ५१ महिला आणि मॉडल्ससोबत ऑनलाइन डेटींग साइट्सच्या माध्यमातून संवाद वाढवला. मग भेटीच्या बहाण्याने त्यांना हॉटेल्समध्ये नेऊन गुप्तपणे त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवले.
कोणत्या वस्तूंचा केला वापर?
नील कॉर्बेलने महिलांची जासूसी करण्यासाठी अनेक प्रकारची उपकरणे वापरली. यात कॅमेरा, डिजिटल अलार्म घड्याळ, फोन, वॉल वॉच, हेडफोन, फोन चार्जर, लॅपटॉप आणि इतकंच काय तर चष्म्याचीही वापर केला. चौकशी अधिकाऱ्यांना त्याच्याकडून एकूण ५१ रेकॉर्डींग सापडले आहेत. ज्यात महिलांचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो होते.
फोटोशूटच्या बहाण्याने मॉडलचे व्हिडीओ
रिपोर्टनुसार, आतापर्यंत चौकशीतून ३१ महिलांची ओळख पटली आहे. यातील १९ महिलांनी कॉर्बेल विरोधात साक्ष देण्यास सहमती दर्शवली आहे. वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात सुनावणी दरम्यान सांगण्यात आलं की, पीडितांपैकी १६ मॉडल होत्या आणि इतर तीन सेक्स वर्कर होत्या. मॉडल्सनी केवळ फोटोशूटसाठी परवानगी दिली होती. पण कॉर्बेलने लपून त्यांची अश्लील व्हिडीओ बनवले. सेक्स वर्करनेही व्हिडीओ बनवण्याची परवानगी दिली नव्हती.
कसा झाला भांडाफोड?
कॉर्बेल एक पोलीस अधिकारी असताना त्याने हे सगळे गुन्हे केले होते. एका मॉडलच्या फोटोशूट दरम्यान कॉर्बेलची घड्याळ वेगळ्या प्रकारची वाटली. घरी परतल्यावर जेव्हा तिने घड्याळाचा ब्रॅन्ड चेक केला तेव्हा समजलं की, तो एक स्पाय कॅमेरा होता. ज्यानंतर मॉडलने पोलिसांकडे तक्रार केली. याचप्रकारे कॉर्बेल त्याच्या एका चष्म्यामुळे पकडला गेला होता.
वकिलांनी त्याला विचित्र आजार असल्याचं कोर्टात सांगितलं. तर बचाव पक्षाच्या वकिलांनी कॉर्बेलचं पोलीस दलातील योगदान बघून त्याची शिक्षा कमी करण्याची मागणी केली आहे. सध्या त्याला काही अटींवर जामिनावर सोडण्यात आलं आहे.