उल्हासनगरात सिंधी संत, पालिकेचे स्वच्छता दुत राहिलेल्या साई कालीराम यांच्यासह दोघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 07:56 PM2020-06-02T19:56:45+5:302020-06-02T20:10:32+5:30
वाढदिवसानिमित सेवाधाऱ्यांना दरबारमध्ये बोळविल्याने अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचा ठपका पोलिसांनी साई यांच्यावर ठेवला आहे.
उल्हासनगर : सिंधी संत व महापालिकेचे स्वच्छता दुत राहिलेल्या साई काली राम यांच्यासह साई परमानंद यांच्यावर रोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. वाढदिवसानिमित सेवाधाऱ्यांना दरबारमध्ये बोळविल्याने अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचा ठपका पोलिसांनी साई यांच्यावर ठेवला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं -५ परिसरात प्रसिद्ध वशनशहा दरबार असून गेल्या आठवड्यात १० पेक्षा जास्त जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने एकच खळबळ उडाली, वशनशाह दरबारचे साई परमानंद व साई कालीराम यांचा वाढदिवसा निमित्त १७ मे रोजी सेवाधारी एकत्र आले होते. अशी चर्चा परिसरात सुरू झाली. त्यामुळेच सेवाधारी व साईच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला. २ जून रोजी रोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी साई परमानंद व साई काली राम यांच्यावर हिल लाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी दिली आहे.
उल्हासनगर महापालिकेने स्वच्छता अभियान अंतर्गत मध्य सन २०१७ साली साई कालीराम स्वच्छता दुत राहिलेले आहे. सिंधी समाजात पूजनीय असलेले साई कालीराम यांच्या वाढदिवसा निमित्त वशनशहा दरबारात सेवाधाऱ्यानी १७ मे रोजी गर्दी केल्याने अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला. असा ठपका पोलिसांनी ठेऊन गुन्हा दाखल केला. यापूर्वी मनाई केली असताना मृत संशयित कोरोना रुग्णाची आंघोळ घातल्याप्रकरणी कोरोनाचा संसर्ग झाल्याचा ठपका ठेवून खन्ना कंपाऊंड येथील मृत कुटुंबावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
Delhi Violence : दिल्ली हिंसाचारप्रकरणी आज करणार आरोपपत्र दाखल, आपचा नगरसेवक देखील आरोपी
हुंड्यामध्ये बाईक न मिळाल्याने संतप्त पतीने पत्नीचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला अन्...