खळबळजनक! 'नो बॉल'चा निर्णय अंपायरच्या जीवावर बेतला; क्रिकेटच्या मैदानातच रक्त सांडले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 12:20 PM2023-04-03T12:20:44+5:302023-04-03T12:21:20+5:30

क्रिकेट मॅचदरम्यान गावात झालेल्या राड्यामुळे २ गावांमध्ये तणाव निर्माण झाला.

Umpire killed for displaying 'no ball' signal during cricket match in Odisha | खळबळजनक! 'नो बॉल'चा निर्णय अंपायरच्या जीवावर बेतला; क्रिकेटच्या मैदानातच रक्त सांडले

खळबळजनक! 'नो बॉल'चा निर्णय अंपायरच्या जीवावर बेतला; क्रिकेटच्या मैदानातच रक्त सांडले

googlenewsNext

ओडिशात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. याठिकाणी क्रिकेटच्या मैदानात खूनी खेळ रंगला. अंपायरला 'नो बॉल'चा निर्णय देणं त्याच्यासाठी जीवघेणं ठरले. एका युवकानं मैदानातच धारदार चाकूने अंपायरची हत्या केली. हे प्रकरण कटकच्या महिशिलांदा गावातील आहे. गावात क्रिकेटच्या मॅच भरवण्यात आल्या होत्या. यावेळी अंपायरने एका मॅचमध्ये नो बॉलचा निर्णय सुनावला. मृत अपांयरचं नाव २२ वर्षीय लकी राऊत असं आहे. आरोपी नागवार गुजरनं त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपीला गावकऱ्यांनी पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. 

मिळालेल्या माहितीनुसार, महिशिलांदा गावात क्रिकेट टूर्नामेंट सुरू होती. येथे ब्रह्मपूर आणि शंकरपूर यांच्यात रंगतदार सामना सुरू होता. हजारोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी ही मॅच पाहण्यासाठी उपस्थित होते. तेव्हा अंपायरनं ब्रह्मपूर टीमविरोधात चुकीचा निर्णय दिला त्यावरून वाद सुरू झाला. अंपायरच्या या निर्णयानं संतापलेल्या स्मृतीरंजन राऊत उर्फ लकी याचा राग अनावर झाला. तो अंपायरशी वाद घालू लागला. हा वाद विकोपाला गेला. 

त्याचवेळी स्मृतीरंजन राऊतनं मैदानातच चाकू काढून अंपायरवर एकापाठोपाठ एक असे वार केले. चाकूच्या वारने अंपायर गंभीर जखमी झाला. खेळाच्या मैदानात रक्त सांडले. या गोंधळात अंपायरला तातडीने एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र हॉस्पिटलमध्ये उपचारावेळी अंपायरचा मृत्यू झाला. या घटनेने गावात तणावाचं वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. 

क्रिकेट मॅचदरम्यान गावात झालेल्या राड्यामुळे २ गावांमध्ये तणाव निर्माण झाला. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी सुरक्षादलाची १ तुकडी गावात बंदोबस्तासाठी तैनात केली. गावकऱ्यांनी आरोपीला पकडले होते. त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर आता पोलीस पुढील तपास करत आहे. गावात सध्या सगळीकडे शांतता असून क्रिकेटच्या पुढील मॅच रद्द करण्यात आल्या आहेत.  

Web Title: Umpire killed for displaying 'no ball' signal during cricket match in Odisha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.