१ महिन्याची सुट्टी घेऊन आलेल्या सैनिक पुतण्यावर काकाने झाडल्या गोळ्या; समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 17:11 IST2021-05-15T21:31:29+5:302021-05-16T17:11:20+5:30

Uncle Shot death Soldier Nephew : दुसरीकडे पोलिसांनी आरोपी काकाविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Uncle shot his soldier nephew, who was on leave for a month, for shocking reasons | १ महिन्याची सुट्टी घेऊन आलेल्या सैनिक पुतण्यावर काकाने झाडल्या गोळ्या; समोर आलं धक्कादायक कारण

१ महिन्याची सुट्टी घेऊन आलेल्या सैनिक पुतण्यावर काकाने झाडल्या गोळ्या; समोर आलं धक्कादायक कारण

ठळक मुद्देपहिली गोळी त्याच्या छातीवर  तर दुसरी गोळी डोक्याला लागली आणि त्याचा मृत्यू झाला.

पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील गहलेवाला गावात घरगुती वादातून काकाने आपल्या लष्करात सैनिक म्हणून काम करणाऱ्या पुतण्याला गोळ्या घालून ठार मारले. पहिली गोळी पुतण्याच्या छातीवर तर दुसरी गोळी त्याच्या डोक्याला लागली आहे. शुक्रवारी दुपारी गहलेवाला गावात ही घटना घडली. दुसरीकडे पोलिसांनी आरोपी काकाविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

घुबया पोलिस चौकी प्रभारी एएसआय सुरेंद्र निखंज यांनी सांगितले की, सैनिक असलेला संदीप सिंह (वय 23) रा. गहलेवाला एका महिन्याच्या सुट्टीवर घरी आला होता. काकूच्या कुटुंबासोबत त्याचा खटला सुरु होता. संदीप या प्रकरणात काका देसा सिंगची मदत मागत होता आणि काकूला त्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यास सांगत होता.



करार नसल्याने संदीपच्या नोकरीला जाण्याचा धोका निर्माण होता. करार न मिळाल्यामुळे संदीपचा काकांशीही वाद झाला. शुक्रवारी सकाळी संदीप आणि त्याच्या काकूच्या कुटूंबातील वादावर पंचायत बोलवण्यात आली, या दोघांच्या वादात पंचायतीत देखील तोडगा निघाला नाही.

पंचायत संपल्यानंतर दुपारी साडेपाचच्या सुमारास संदीप मामाच्या घरी गेला. इथे कशावरून तरी भांडणानंतर दोघांमध्ये जोरदार वाद  झाला. यानंतर काका देसा यांनी त्याच्या परवानाधारक पिस्तुलाने संदीपवर दोन गोळ्या झाडल्या. पहिली गोळी त्याच्या छातीवर  तर दुसरी गोळी डोक्याला लागली आणि त्याचा मृत्यू झाला.



गोळीबारात जखमी झालेला संदीप जमिनीवर पडला आणि त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर देसा तेथून पळून गेला. माहिती मिळताच पोलिस दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीचा शोध सुरु केला. दुसरीकडे, पोलिस ठाणे सदर जलालाबाद पोलिसांनी आरोपी देसा सिंगवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

Web Title: Uncle shot his soldier nephew, who was on leave for a month, for shocking reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.