पुतण्याची हत्या करणाऱ्या काकाला अखेर अटक; प्रेमप्रकरणाला विरोध केल्याने केले कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 07:36 AM2021-11-03T07:36:35+5:302021-11-03T07:37:03+5:30
Crime News: गुन्ह्यात वापरलेली दुचाकी राेहा एसटी स्टॅण्ड परिसरात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळले. संताेषसाेबत रुद्र दिसला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : माणगाव येथील दाेन वर्षांच्या रुद्र यादव या मुलाचे अपहरण करून हत्या करणाऱ्या व्यक्तीला रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. संताेष यादव असे त्याचे नाव आहे. विशेष म्हणजे रुद्रची हत्या करणारा हा त्याचा काका आहे.
रुद्रच्या आई-वडिलांनी संताेष याच्या प्रेमप्रकरणाला विराेध केला हाेता. त्याचा राग मनात ठेवून संताेष याने रुद्रला संपवून त्याचा बदला घेतल्याची कबुली दिल्याची माहिती रायगडचे पाेलीस अधीक्षक अशाेक दुधे यांनी अलिबाग येथे दिली.
२६ ॲाक्टाेबर २१ राेजी संताेष रुद्रला घरातून फिरायला घेऊन गेला हाेता. रुद्रला फिरायला घेऊन गेलेला संताेष रात्रीपर्यंत परत आला नाही. त्यामुळे रुद्रच्या आई-वडिलांनी माणगाव पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पाेलिसांनी तपासासाठी आठ पथके तैनात केली.
गुन्ह्यात वापरलेली दुचाकी राेहा एसटी स्टॅण्ड परिसरात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळले. संताेषसाेबत रुद्र दिसला नाही. त्यामुळे त्याचे बरेवाईट केल्याचा संशय पाेलिसांना आला. त्यानंतर संताेष मुंबईमधील मित्राच्या संपर्कात आल्याची माहिती मिळाली.
पाेलिसांनी दमण, दीव, सिल्वासा येथे त्याच्या प्रेयसीच्या मदतीने सापळा लावून संताेषला अटक केली. संताेषला रुद्रबाबत विचारले असता ठार मारून राेहा-मुरुड राेडवर टाकल्याचे सांगितले. पाेलिसांनी रुद्रचा मृतदेह काटेरी झुडपातून ताब्यात घेतला. शवविच्छेदन करुन पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे दुधे यांनी सांगितले. या घटनेप्रकरणी संतोष याला न्यायालयात हजर केले असता, त्याला ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.