नागपुरात अनियंत्रित स्टार बसची स्कार्पियोला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:22 PM2020-01-15T23:22:56+5:302020-01-15T23:24:06+5:30
गिट्टीखदान चौकात अनियंत्रित स्टार बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या स्कार्पियोला धडक दिल्यानंतर रोड डिव्हायडर, हायमास्ट लाईट आणि डिपीला धडक दिल्यामुळे खळबळ उडाली. ही घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजता घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गिट्टीखदान चौकात अनियंत्रित स्टार बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या स्कार्पियोला धडक दिल्यानंतर रोड डिव्हायडर, हायमास्ट लाईट आणि डिपीला धडक दिल्यामुळे खळबळ उडाली. ही घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजता घडली.
क्लार्क टाऊन येथील रहिवासी जितेश धवन स्कार्पियो क्रमांक एमएच ३१, डी. के-१३५७ ने गिट्टीखदान चौकाकडून न्यु काटोल नाक्याकडे जात होते. सिग्नल बंद असल्यामुळे जितेश गिट्टीखदान चौकात थांबले होते. त्यावेळी मागून आलेल्या स्टार बस क्रमांक एम. एच. ३१-सी. ए-६००९ च्या चालकाने स्कार्पियोला धडक दिली. स्टार बसचा वेग अधिक असल्यामुळे स्कार्पियोला धडक दिल्यानंतर स्टारबस रोड डिव्हायडरवर चढली. बसने रोड डिव्हायडर, हायमास्ट लाईट आणि डीपीचे नुकसान केले. या घटनेमुळे गिट्टीखदान चौकात खळबळ उडाली. बस पासून बचाव करण्यासाठी वाहनचालक इकडे तिकडे पळून गेले. यात स्कार्पियो चालक जितेश आणि बसमधील दोन प्रवासी जखमी झाले. गिट्टीखदान पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बसचा चालक भूषण साहेबराव मानेकर (३०) यास ताब्यात घेतले. त्याने ब्रेक फेल झाल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले. गिट्टीखदान पोलिसांनी भूषण विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बसचे ब्रेक फेल झाल्याची पुष्टी केली आहे. मंगळवारी सकाळी म्हाळगीनगर चौकात याच पद्धतीने टिप्परच्या धडकेत दोन नागरिकांचा मृत्यू तसेच १० जण जखमी झाले होते.