आधार कार्डचा बहाणा, अल्पवयीन मुलीला शाळेतून घेऊन जाणाऱ्या तरुणावर गुन्हा
By रूपेश हेळवे | Published: July 12, 2023 03:57 PM2023-07-12T15:57:44+5:302023-07-12T15:58:02+5:30
याप्रकरणी संजय लक्ष्मण गुळगे (रा. सोलापूर ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूर : शाळेत गेलेल्या मुलीला तिचे आधार कार्ड काढायचे आहे असे सांगून तिला आपल्या सोबत शेतात घेऊन जाणाऱ्या तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडित मुलीच्या पित्याने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी संजय लक्ष्मण गुळगे (रा. सोलापूर ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित मुलगी ही एका शाळेत नववीमध्ये शिकत आहे. तिच्या शाळेत जाऊन आरोपी मुलाने तिचे आधार कार्ड काढायचे आहे असे खोटे सांगितले. यामुळे तिला शिक्षकांनी शाळेतून सोडले. आरोपीने तिला खाऊ खाण्यासाठी ५० रुपये देतो असे सांगून शाळेपासून काही अंतरावर असलेल्या शेतात घेऊन दुचाकीवरून घेऊन गेला.
या घटनेची माहिती पीडितेच्या पित्याला कळाल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी आरोपीला वारंवार फोन केल्याने पीडितेला तेथेच एकटीला सोडून गेला, अशा आशयाची फिर्याद पीडितेच्या पित्याने दिली आहे. या प्रकरणी संजय गुळगे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.