मर्डर केला अन् विसरला, मग पूर्ण रात्र पत्नीच्या मृतदेहासोबत झोपला आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 12:07 PM2022-06-18T12:07:48+5:302022-06-18T12:08:16+5:30
Delhi Crime News : घाबरून त्याने मित्राला फोन केला आणि सांगितलं की, पत्नीचा मृत्यू झाला. मित्राने पोलिसांना याची सूचना दिली. ज्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली.
Delhi Crime News : दिल्लीच्या फतेहपूर बेरीमध्ये पतीने आधी पत्नीसोबत भरपूर दारू ढोसली. नंतर दोघांमध्ये जेवण वाढण्यावरून भांडण झालं. भांडण इतकं वाढलं की, पतीने पत्नीचं तोडं उशीने दाबलं. यात पत्नीचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. पण पतीला हे माहीतच नव्हतं आणि तो रात्रभर मृतदेहासोबत झोपला. सकाळी जेव्हा त्याने पत्नीला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा उठली नाही. घाबरून त्याने मित्राला फोन केला आणि सांगितलं की, पत्नीचा मृत्यू झाला. मित्राने पोलिसांना याची सूचना दिली. ज्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली.
सुल्तानपूर परिसरातील ही घटना आहे. इथे 39 वर्षीय सोनाली पतीसोबत राहत होती. दोघांचं लग्न 2008 मध्ये झालं होतं. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊननंतर पती विनोद कुमारची नोकरी गेली होती. तेव्हापासून तो बेरोजगार होता. विनोद घरीच राहत होता. यादरम्यान त्याला दारूची वाईट सवय लागली.
असं सांगितलं जात आहे की, गुरूवारी रात्री विनोद दारू घेऊन आला होता. पती-पत्नीने मिळून दारू प्यायली. मग पत्नी सोनालीने जेवायला वाढलं. यावेळी जेवण वाढण्यावरून दोघांमध्ये भांडण झालं. वाद इतका वाढला की, रागाच्या भरात विनोदने सोनाली तोंड उशीने दाबलं. श्वास गुदमरल्याने सोनालीचा मृत्यू झाला. पण नशेत असल्याने विनोदच्या हे लक्षातच आलं नाही. तो रात्रभर सोनालीच्या मृतदेहासोबत झोपला होता.
सकाळी उठल्यावर त्याने पत्नी सोनालीला उठवण्याचा प्रयत्न केला. पण ती काही उठली नाही. नंतर समजलं की, तिचा मृत्यू झाला. घाबरून विनोदने मित्राला फोन केला आणि सगळं काही सांगितलं. मित्राने लगेच पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून विनोदला अटक केली. आता पुढील चौकशी सुरू आहे.