ऑनलाईन वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 08:43 PM2021-11-23T20:43:25+5:302021-11-23T20:43:48+5:30

online prostitution : मूळची कोलकत्ताची असणारी प्रिया ( २२ ) रा . बाळाराम पाटील मार्ग , भाईंदर पूर्व हि भोजपुरी गाण्यांच्या अल्बममध्ये काम करते.

Unethical human trafficking branch action on online prostitution | ऑनलाईन वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेची कारवाई

ऑनलाईन वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेची कारवाई

Next

मीरारोड - ऑनलाईन वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या भोजपुरी गाण्यांच्या अल्बम मध्ये काम करणाऱ्या तरुणीस मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने अटक करून २ पीडित तरुणींची सुटका केली आहे. 

मूळची कोलकत्ताची असणारी प्रिया ( २२ ) रा . बाळाराम पाटील मार्ग , भाईंदर पूर्व हि भोजपुरी गाण्यांच्या अल्बममध्ये काम करते. ती इंटरनेट संकेतस्थळा वरून वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरवणे आणि त्यासाठी शहरात लॉजमध्ये खोली बुक करून देण्याचे काम करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांना मिळाली. 

त्या अनुषंगाने पाटील यांनी सोमवार २२ रोजी बोगस गिऱ्हाईका मार्फत सापळा रचला . मीरारोडच्या सिनेमॅक्स चौक, मनमंदिरा स्वीट समोर बनावट गिऱ्हाईकास पाठवले. पाटील सह उमेश पाटील,  विजय निलंगे, केशव शिंदे, सुप्रिया तिवले,  सुनिता आवताडे, गावडे यांनी पैसे स्वीकारताच पूजा ला पकडले. तिने वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या २ पीडित तरुणींची सुटका केली. या प्रकरणी तिचा साथीदार रवि साहू रा. नायगाव याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Unethical human trafficking branch action on online prostitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.