ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 03:27 PM2022-11-15T15:27:48+5:302022-11-15T16:29:40+5:30

वारूळवाडी येथील ही दुसरी घटना असून सहा महिन्या पूर्वी जुन्या ग्रामपंचायतीच्या समोर अशाच प्रकारे महिलेच्या डोक्यावरून ट्रक जाऊन अपघात झाला होता.

Unfortunate death of 22-year-old pregnant woman at Pune | ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू

ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू

googlenewsNext

नारायणगाव - ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा धक्का लागून खाली पडलेल्या विवाहित महिलेच्या डोक्यावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. १४) संध्याकाळी ६.३० वा. वारुळवाडी येथील भागेश्वर दूध डेअरीच्या समोर घडली अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. दरम्यान, ऊस वाहतूक करणाऱ्या चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विद्या रमेश कानसकर (वय २३) रा. दौंडकरवाडी निमदरी, ता जुन्नर असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. तर ट्रॅक्टर ट्रॉली चालक गोरक्ष सुखदेव ढेंबरे मु. पो. साकुर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर याचेवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, रमेश कानसकर हे सोमवारी दि . १४ रोजी सायंकाळी सासु विमल जाधव आणि पत्नी विद्या यांच्या सोबत नारायणगांव येथे कानातील सोन्याचे दागिने खरेदीसाठी आले होते . त्यानंतर दुचाकी (एम.एच. १४ बी.एच. ३७६) वरुन नारायणगाव वरून वारूळवाडी - सावरगाव रस्त्याने घरी जात असताना वारुळवाडी येथील भागेश्वर दुध डेअरी समोर गतीरोधक असल्याने पत्नी विद्या गाडीवरुन खाली उतरली. तेंव्हा समोरून ट्रॅक्टर (एम.एच. १३ जे. ५३००) दोन ट्रॉल्या ऊसाने भरलेल्या येत होत्या , एक नंबरचे ट्रॉलीतील ऊसाचा विद्याला धक्का लागल्याने ती रोडवर पडली. त्यावेळी तिचे डोक्यावरुन ट्रॅक्टरचे चाक गेल्याने गंभीर जखमी झालेल्या विद्या यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दरम्यान, वारूळवाडी येथील ही दुसरी घटना असून सहा महिन्या पूर्वी जुन्या ग्रामपंचायतीच्या समोर अशाच प्रकारे महिलेच्या डोक्यावरून ट्रक जाऊन अपघात झाला होता. या घटने नंतर हि प्रशासनाला जाग आली आलेली नाही. रस्त्याच्या कडेला माती टाकल्याने दुचाकी वाहने घसरून अपघात झालेले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत, सहा महिन्यात दोन बळी गेल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त आहे. आणखी किती बळी गेल्यावर  सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येईल असा सवाल नागरिक करीत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Unfortunate death of 22-year-old pregnant woman at Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात