उल्हासनगरमध्ये धुळवडीच्या उत्सवाला 'गालबोट', मुलीच्या छेडछाडीसह हाणामारीच्या ४ घटना
By सदानंद नाईक | Updated: March 15, 2025 13:57 IST2025-03-15T13:56:28+5:302025-03-15T13:57:06+5:30
एकूण पाच गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल

उल्हासनगरमध्ये धुळवडीच्या उत्सवाला 'गालबोट', मुलीच्या छेडछाडीसह हाणामारीच्या ४ घटना
सदानंद नाईक, उल्हासनगर: धुळवडीच्या दिवशी शहरांत मुलीची छेडछाड, हाणामारी, चाकूने वार, डोक्यात बिअर बॉटल मारून जखमी करणे, चॉपर दाखवून दहशत माजवीने आदी घटना उघड झाल्या. याप्रकरणी एकूण पाच गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले असून शहरात जोरात शिमगा साजरा झाल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-१ मध्ये फक्कड मंडली ते झुलेलाल मंदिर दरम्यान सासरी धुळवड खेळून घरी जाणाऱ्या अमित पुरस्वानी यांच्या मुली सोबत छेडछाड करण्याचा व त्यांना मारहाण झाल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी उघड झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात भावेश होटचंदानी, रोहित जग्याशी यांच्यासह अन्य जनावर गुन्हा दाखल झाला. दुसऱ्या प्रकारात रवींद्र नोमी राम यांनी दारू पाजली नाही, या रागातून ज्ञानेश्वर व विनोद उरंग यांनी रवींद्र यांच्यावर चाकूने वार करून जखमी केले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कॅम्प नं-३ येथील डर्बी हॉटेल समोर शुक्रवारी मध्यरात्री अडडीच वाजता अनिल मखन पाल याने दारू पिऊन गैरवर्तन केल्या प्रकरणी मध्यवर्ती पोलीसानी गुन्हा दाखल झाला.
कॅम्प नं-४ संतोषनगर मध्ये मित्राकडे घुलवड खेळण्यासाठी गेलेल्या विशाल गुप्ता यांना जग्गु उर्फ नैनेश, छोट्या उर्फ गणेश राणे, प्रवीण डायरे व अन्य जणांनी मारहाण करून चॉपर दाखवीत परिसरात दहशत माजविली. या प्रकरणी विठ्ठलावाडी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पाचव्या प्रकारात कॅम्प नं-४, भीम कॉलनी येथे धुळवड खेळत असताना करण जाधव यांचा मोबाईल हरविला. मोबाईल घेतला का असे विचारले असता याचा राग येऊन विशाल ननवरे, संघर्ष शिंदे वा स्वप्नील यांनी करण जाधव यांच्या डोक्यावर बिअरची बॉटल मारून जखमी केले. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. एकूणच उल्हासनगरात धुळवडच्या दिवसी शिमगा साजरा झाल्याचे उघड झाले आहे.