खळबळजनक! अंबरनाथमध्ये अज्ञात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 02:34 PM2022-01-02T14:34:20+5:302022-01-02T17:24:18+5:30
Murder Case : अंबरनाथ पश्चिम पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृत तरुणाची ओळख पटविण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
अंबरनाथ पश्चिमेच्या डीएमसी कंपनीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात एका अज्ञात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. काल रात्रीच्या सुमारास तरुणाची हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंबरनाथ पश्चिम पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृत तरुणाची ओळख पटविण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
अंबरनाथमध्ये नववर्षाच्या पहिल्याच रात्री काही व्यक्तीने एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केली ही घटना एक तारखेला रात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तरुणाचं नाव रवी तिवारी असून तो ठाकुरपाडा परिसरातील रहिवासी आहे. अंबरनाथ डी एम सी कंपनीच्या शेजारी असलेल्या मोकळ्या भूखंडावर एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे. या तरुणाची एक जानेवारी रोजी रात्री दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. नेमका हा प्रकार का घडला आणि कोणी केला हे यक्बाबत अद्याप पोलीसही संभ्रमात आहेत.
डी एम सी कंपनीच्या शेजारी असलेल्या मोकळ्या भूखंडावर रात्रीच्या वेळेस तळीरामांचा आणि नशेखोर तरुणांचा वापर मोठ्या प्रमाणात असतो. ज्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे त्या तरुणाचे नाव रविवारी असून तो अंबराच्या ठाकूर पाण्यात राहणारा आहे तसेच तो नियमित मजुरीची कामे करीत होता. त्याच्या चेहऱ्यावर मोठा दगड टाकून त्याचा चेहरा विद्रूप करण्यात आला आहे. हा प्रकार आपापसातील वादातून घडला आहे, की पूर्ववैमनस्यातून घडला आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. या तरुणाच्या संपर्कात असलेल्या प्रत्येकाचे पोलिस कसून चौकशी करीत आहेत.