Video : नारायण राणे रायगड पाेलिसांसमाेर हजर; व्हाॅईस सॅम्पल घेतले नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 05:27 PM2021-09-13T17:27:39+5:302021-09-13T17:28:39+5:30
Narayan Rane :जन आशिर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले हाेते.
निखिल म्हात्रे
अलिबाग - न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज रायगडपोलिसांकडे हजेरी लावली. पाेलिसांनी त्यांचा जबाब नाेंदवून घेतला मात्र त्यांचे काेणतेही व्हाॅईस सॅम्पल घेतले नाही.
जन आशिर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले हाेते. राणे यांना महाड पाेलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले हाेते. त्यांनतर न्यायालयाने राणे यांना काही अटी, शर्तीवर जामिन मंजूर केला हाेता. 30 आॅगस्ट आणि 13 सप्टेंबर अशा दाेन दिवस राणे यांनी रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात हजेरी लावावी असे आदेश न्यायालयाने दिले हाेते. 30 आॅगस्ट राेजी प्रकृती ठिक नसल्याचा अर्ज राणे यांच्या वकीलानी रायगड पाेलिसांना देत राणे गैहजर राहीले हाेते. 13 सप्टेंबरला राणे हजेरी लावणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले हाेते.
नारायण राणे अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात दाखल pic.twitter.com/GjNQchUCZZ
— Lokmat (@MiLOKMAT) September 13, 2021
केंद्रीय मंत्री राणे हे जुहू येथील निवास्थानातून साेमवारी दुपारी 12 वाजता अलिबागकडे रवाना झाले. दुपारी ठिक आडीच वाजता जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या कार्यालयात हजर झाले. अवघ्या 15 मिनीटांतच पाेलिसांनी त्यांची हजेरी घेत जबाब नाेंदवला. त्यानंतर राणे बाहेर पडले.
न्यायालयाच्या आदेशानुसार मी पोलिस अधिक्षकांच्या कार्यालयात आलो. असे असले तरी मी कोणताही जबाब नोंदवला नाही. या संपुर्ण प्रकरणात रायगड पोलिसांनी सहकार्य केले. - केंद्रीय मंत्री नारायण राणे.
न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज रायगड पोलिसांकडे हजेरी लावली, त्यावेळी राणे यांनी प्रसार माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया pic.twitter.com/eNcxHV7BZ2
— Lokmat (@MiLOKMAT) September 13, 2021
मागच्या वेळी येणे शक्य नव्हते त्याची कारणे लेखी स्वरूपात दिली होती. नारायण राणे यांचा जबाब नोंदवला आहे. त्यांची जी चौकशी करायची होती ती त्यांनी केली. आम्ही पोलिसांना सर्व सहकार्य करू, व्हाॅइस सॅम्पल आज घेतले नाही. पुढची तारीख काही सांगितली नाही पोलिसांना आम्ही सहकार्य करू. - संग्राम देसाई , नारायण राणे यांचे वकील