बापरे! प्रेमात युवक ना मुलगा राहिला ना मुलगी; मध्येच ट्रिटमेंट थांबवली, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 04:44 PM2022-02-11T16:44:57+5:302022-02-11T16:45:35+5:30
३२ वर्षीय युवक हा त्याच्या आई वडिलांसाठी एकुलता एक मुलगा आहे. त्याचे वडील क्लासवन ऑफिसर होते आणि पोस्टातून निवृत्त झाले आहेत.
एका युवकानं त्याच्या प्रेयसीसोबत राहण्यासाठी जेंडर चेंज करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. त्याच्यावर लिंग बदलाची शस्त्रक्रिया सुरु होती. आई वडिलांनी युवकाला समजवण्यासाठी अथक प्रयत्न केले. परंतु त्यानंतर अचानक त्याची ट्रिटमेंटमध्येच थांबवावी लागली. याचमुळे युवकाच्या शरीरात मोठा बदल झाला. युवकाच्या शरीरात मुलगा आणि मुलगी दोन्ही हॉर्मोन तयार झाले.
३२ वर्षीय युवक हा त्याच्या आई वडिलांसाठी एकुलता एक मुलगा आहे. त्याचे वडील क्लासवन ऑफिसर होते आणि पोस्टातून निवृत्त झाले आहेत. दिल्ली मल्टिनॅशनल कंपनीत तो जॉब करतो. त्याठिकाणी एका सहकारी मैत्रिणीवर त्याचा जीव जडला. त्यानंतर तिच्यासोबत राहण्यासाठी त्याने चक्क जेंडर चेंज करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात त्याच्या शरीरातील हॉर्मोनल चेंज करण्यात आले. त्यानंतर तो मुलींसारखा व्यवहार करु लागला. अचानक झालेल्या बदलामुळे कुटुंबालाही धक्का बसला. त्यानी युवक आणि सहकारी मैत्रिणीचं काऊंसलिंग करण्याचा निर्णय घेतला. युवक दिल्ली आणि महिला मूळत: मध्य प्रदेशात राहणारी आहे.
युवकाचे आई वडील भोपाळमधील वकील सरिता राजानी यांच्याकडे समुपदेशनासाठी पोहचले. ते म्हणाले की, दीड महिन्यात मुलाच्या वागणुकीत बदल दिसला. तो एकटा रडायचा. रागात असायचा आणि प्रत्येक गोष्टीत चिडचिड करायला लागला. त्यानंतर वकील सरिता यांनी मुलाचं आणि महिलेचं काऊंसलिंग केले. सध्या युवकाची जेंडर चेंज शस्त्रक्रिया अर्ध्यावर रोखली आहे.
महिलेने लग्नासाठी दिला नकार
काऊन्सिलिंगवेळी युवकाने सांगितले की, त्याच्यासोबत ३० वर्षीय महिला जॉब करते. महिलेच्या पतीची कोरोनामुळे २ वर्षापूर्वी मृत्यू झाला आहे. तिला एक मुलगी आहे. दोघंही ६ महिन्यापूर्वी भेटले होते. ती आपल्या घरी जाऊ इच्छित नाही. ती एकटी राहते. तेव्हापासूनच युवक आणि महिलेमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर त्याचं प्रेमात रुपांतर झालं. युवकानं लग्नासाठी तिच्यासमोर प्रस्ताव ठेवला परंतु महिलेने अमान्य केले. ती पतीवर खूप प्रेम करत होती. त्याच्याशिवाय दुसऱ्याला पती म्हणून स्वीकारु शकत नाही असं महिलेने युवकाला सांगितले. त्यामुळे युवकाने जेंडर चेंज करण्याचा निर्णय घेतला.