भयंकर! "दर 11 व्या मिनिटाला होतो एका 'श्रद्धा'चा मृत्यू, घरचे किंवा पार्टनरच करताहेत हत्या"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 05:03 PM2022-11-22T17:03:48+5:302022-11-22T17:19:57+5:30

गुटेरेस यांनी सांगितले की, दर 11 व्या मिनिटाला एका महिलेची हत्या केली जाते आणि या अशा प्रकरणात जास्त करुन कधी घरातीलच लोकं असतात तर कधी महिलेचे पार्टनरच तिचा जीव घेतात अशीही माहितीही त्यांनी दिली आहे.

united nations chief antonio guterres every 11 minute one women killed | भयंकर! "दर 11 व्या मिनिटाला होतो एका 'श्रद्धा'चा मृत्यू, घरचे किंवा पार्टनरच करताहेत हत्या"

भयंकर! "दर 11 व्या मिनिटाला होतो एका 'श्रद्धा'चा मृत्यू, घरचे किंवा पार्टनरच करताहेत हत्या"

Next

श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. श्रद्धाच्या हत्याकांड प्रकरणात तिचा बॉयफ्रेंड हा मुख्य आरोपी आहे. श्रद्धा हत्याकांडसारखीच अनेक प्रकरणं आता समोर येऊ लागली आहेत. या प्रकरणामध्ये कधी बॉयफ्रेंड, कधी नवरा तर कधी प्रियकरानेच आपल्या जोडीदाराला संपवले आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे प्रमुख एंटोनियो गुटेरेस यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. गुटेरेस यांनी सांगितले की, दर 11 व्या मिनिटाला एका महिलेची हत्या केली जाते आणि या अशा प्रकरणात जास्त करुन कधी घरातीलच लोकं असतात तर कधी महिलेचे पार्टनरच तिचा जीव घेतात अशीही माहितीही त्यांनी दिली आहे.

एंटोनिया गुटेरेस यांनी सांगितले की, महिलां विरोधात घडणाऱ्या या हिंसा मानवाधिकारविरोधी आहेत. त्यांच्या जगण्याचे हक्क बळकावण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यासाठी देशातील अस्तित्वात असलेल्या सरकारनी त्यासाठी राष्ट्रीय कृती आरखडा तयार करण्याचा सल्ला दिला आहे. गुटेरेस यांनी हे 25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ‘महिलांवरील हिंसाचाराचे उच्चाटन’ या कार्यक्रमाआधीच त्यांनी हे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांनी सांगितले की दर 11 व्या मिनिटाला होणाऱ्या महिला हत्याकांडामध्ये तिचा जोडीदार किंवा तिच्याच घरातील लोकं तिला संपवत असतात असंही त्यांनी यावेळी सांगितले.

गुटेरेस यांनी सांगितले की, महिला ऑनलाईन पद्धतीनेही त्यांचे शोषण केले जात आहे. महिलांच्या विरोधात घाणेरडी शेरेबाजी करणे, पोर्नोग्राफी, लैंगिक शोषण आणि त्यांचे फोटो घेऊन त्यामध्ये नको ते बदल करणे या सारख्या घटना आता सर्रासरपणे केल्या जात आहेत. या अशा प्रकारामुळे महिला आणि मुलींच्या आयुष्यावर विपरित परिणाम होत आहेत. अशा गोष्टींमुळे मुक्तपणे जीवन जगण्यावर मर्यादा पडतात. तसेच यामुळे त्यांच्या मुलभूत अधिकारांवर त्याचा वाईट परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

महिलांच्या होणाऱ्या हत्येमुळे एंटोनिया गुटेरेस यांनी अनेक देशातील सरकारला जाहीर आवाहन केले आहे की, महिला आणि मुलींविरोधोत घडणाऱ्या वाईट घटनाविरोधात कडक पावले उचला. यासाठी प्रत्येक देशातील सत्ताधारी लोकांनी सामान्य माणसांची मदत घेऊन राष्ट्रीय पातळीवर राबवण्यासाठी एक राष्ट्रीय कृती आरखडा बनवा. कायद्याचे उल्लंघन होणार नाही. त्याबरोबरच महिलांसाठी काम करणाऱ्या ज्या ज्या विविध संघटना आहेत, त्यांचा निधी वाढवण्या संदर्भातही विचार केला जावा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: united nations chief antonio guterres every 11 minute one women killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.