रेल्वे स्थानकात सापडलेल्या बेवारस बागेत पाहून कर्मचारी, अधिकारी अन् आरपीएफ जवान चक्रावले

By पूनम अपराज | Published: February 17, 2021 03:10 PM2021-02-17T15:10:43+5:302021-02-17T15:11:53+5:30

Unknown Bag Found : आयकर विभाग याप्रकरणी पुढील तपास करेल असे रेल्वेचे उप सीटीएम हिमांशु उपाध्याय यांनी सांगितले.

Unknown bag found at 'Ya' railway station; Seeing this, the railway workers, officers and RPF jawans were shocked | रेल्वे स्थानकात सापडलेल्या बेवारस बागेत पाहून कर्मचारी, अधिकारी अन् आरपीएफ जवान चक्रावले

रेल्वे स्थानकात सापडलेल्या बेवारस बागेत पाहून कर्मचारी, अधिकारी अन् आरपीएफ जवान चक्रावले

Next
ठळक मुद्दे बॅग उघडताच जवळपास 1.40 कोटी रुपयांची रोकड भरल्याने प्रत्येकाचे डोळे पांढरे झाले आणि धक्का बसला.

कानपूर - नवी दिल्लीतील मध्य रेल्वेच्या कानपुर रेल्वे स्थानकात जयनगरला जाणाऱ्या स्वातंत्र्य सेनानी एक्स्प्रेसच्या पॅन्ट्रीकारमध्ये बेवारस सूटकेस बॅग मिळाल्याची माहिती रेल्वे अधिकारी, जीआरपी आणि आरपीएफच्या जवानांना मिळाली. बॅग उघडताच जवळपास 1.40 कोटी रुपयांची रोकड भरल्याने प्रत्येकाचे डोळे पांढरे झाले आणि धक्का बसला. या लाल रंगाच्या बेवारस सूटकेसमधील जप्त केलेलया रक्कमेत दोन हजार, पाचशे, दोनशे आणि शंभर रुपयांच्या नोटा होत्या. हे प्रकरण हवाला व्यवसायाशी जोडल्या जाण्याची शक्यता आहे. सध्या ही रक्कम आयकर विभागाकडे देण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.

आयकर विभाग याप्रकरणी पुढील तपास करेल असे रेल्वेचे उप सीटीएम हिमांशु उपाध्याय यांनी सांगितले. ते म्हणाले की, ट्रेनमध्ये बेवारस बॅग सापडल्यानंतर जीआरपी आणि आरपीएफच्या उपस्थितीत  बॅग उघडण्यात आली तेव्हा अधिकारी आणि कर्मचारी धक्काने उडाले. नोटांच्या मोजणी दरम्यान एक कोटी 40 लाख रुपये असल्याचे कळाले. यानंतर आयकर अधिकाऱ्यांनाही कळविण्यात आले.

पोलिसांच्या सुरक्षेत बॅग ठेवली


या संपूर्ण प्रकरणाची माहिती रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांनाही देण्यात आली. सध्या पोलिसांच्या संरक्षणाखाली नोटांनी भरलेली ही बॅग ठेवली होती. या पैशांबाबत प्रभारी निरीक्षक जीआरपी राममोहन रॉय म्हणाले की, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बॅग उघडली गेली आणि त्यातील नोटांची मोजणी केली गेली. नोटांची मोजणी करताना छायाचित्रणही केले गेले जेणेकरून ते रेकॉर्डवर ठेवता यावे. पोलिसांनीही त्याचा तपास सुरू केला आहे.

Web Title: Unknown bag found at 'Ya' railway station; Seeing this, the railway workers, officers and RPF jawans were shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.