माथेफिरूने ४० महिला पोलिसांना केले हैराण, व्हॉट्सअॅप ग्रुप बनवून पाठवत होता अश्लील मेसेज
By पूनम अपराज | Published: December 4, 2020 09:58 PM2020-12-04T21:58:16+5:302020-12-04T21:58:53+5:30
Cyber Crime : फिरोजाबादच्या हेड कॉन्स्टेबलच्या मुलीच्या हरवलेल्या फोनमधून माथेफिरुला या महिलांचे मोबाइल फोन नंबर मिळाले आहेत.
आग्रा येथील ४० महिला पोलिसांसह इतर मुलींना एक माथेफिरू फोनवर कॉल करून घाणेरडे मेसेज करून त्रास देत आहे. त्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप बनवून अश्लील मेसेज पाठवत होता. फिरोजाबादच्या हेड कॉन्स्टेबलच्या मुलीच्या हरवलेल्या फोनमधून माथेफिरुला या महिलांचे मोबाइल फोन नंबर मिळाले आहेत. त्याला हा हरवलेला मोबाइल सापडला आहे.
हेड कॉन्स्टेबलची मुलगी आधी एक पोलीस होती, परंतु नंतर पोलिस विभागाची नोकरी सोडून ती शिक्षिका झाली. सीतापुरात केलेल्या पोलीस शिपायाच्या प्रशिक्षणात तिच्या बॅचच्या महिलांचे मोबाइल नंबरही तिच्या फोनमध्ये सेव्ह होते. या प्रकरणाची फिर्याद एसपी क्राईमकडे नोंदविण्यात आली आहे. त्याने तपास सायबर सेलकडे सोपविला आहे.
रकाबगंज भागातील रहिवासी हेड कॉन्स्टेबल फिरोजाबादमधील पाचोखरा पोलिस ठाण्यात तैनात आहे. काही दिवसांनी तिच्या मुलीचे लग्न झाले आहे. हेड कॉन्स्टेबलने सायबर सेलमध्ये अर्ज दिला आहे. त्यात म्हटले आहे की, मुलगी 27 नोव्हेंबरला लुहार गली आणि पॉवर हाऊस येथे गेली होती. वाटेत तिचा फोन हरवला. मोबाईल चोरी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. फोनमध्ये शंभराहून अधिक तरूणी, नातेवाईक, बहिणी आणि भाऊ आहेत. याशिवाय मुलीच्या बॅचच्या पोलिसांचे नंबरही आहेत.
तो पोलिसांची मुलगी असल्याचे बतावणी करून संवाद साधतो
हेड कॉन्स्टेबलने सांगितले की, माथेफिरू आपली ओळख उघड करीत नाही. तो पोलिसांची मुलगी म्हणून बोलतो. मुलीने तिचे सिम ब्लॉक केले. यानंतर माथेफिरूने त्याचे सिम घातले आहे. मुलीने व्हॉट्स अॅप ग्रुप बनविला होता. त्या ग्रुपमधून नंबर घेऊन एक नवीन ग्रुप त्याने बनवला.
तो मुलीच्या नावावर अश्लील मेसेज पाठवत आहे. तिच्या मैत्रिणींचे त्याला कॉल आले, त्यानंतर माथेफिरूची करतूत उघडकीस आली. ज्या नंबरवरुन त्याने मेसेज पाठवला त्या नंबरवर फोन केला असता तो कॉल रिसिव्ह करत नाही. मेसेजिंगवर पोलिसाची मुलगी असल्याचं भासवून नंबर बदलला असल्याचे उत्तर देतो.
200 सदस्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला, 140 जणांनी लेफ्ट केला
हेड कॉन्स्टेबलने सांगितले की, माथेफिरूने व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये 200 तरूणी आणि स्त्रिया जोडल्या आहेत. हे सर्व मुलीच्या मैत्रिणी आणि त्यांचे नातेवाईक आहेत. अशोभनीय संदेश पाहून त्यापैकी 140 जणांनी पोलिसाच्या मुलीला फोन करून माहिती दिली. जेव्हा त्याला कळले तेव्हा त्यांनी ग्रुप सोडला. तो व्हॉट्सअॅप कॉलिंग करतो. अॅपच्या मदतीने तो तरुणीचा आवाज काढून बोलायचा.
माथेफिरूने स्वत: ला फतेहाबादचा असल्याचे सांगितले
हेड कॉन्स्टेबलच्या मुलीने माथेफिरुला मेसेज केला. त्याच्याशी गप्पा मारत आणि पत्ता विचारला असता त्याने सांगितले की, तो फतेहाबादचा रहिवासी आहे. हेड कॉन्स्टेबलनेही पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. आता पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.