अज्ञाताने पॉर्न वेबसाईटवर टाकला तरुणीचा मोबाईल नंबर अन्

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 14:29 IST2019-11-06T14:24:04+5:302019-11-06T14:29:24+5:30

वैतागलेल्या तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Unknown posted on porn website Mobile phone number of young girl and pornographic messages, video calls started appearing to girl | अज्ञाताने पॉर्न वेबसाईटवर टाकला तरुणीचा मोबाईल नंबर अन्

अज्ञाताने पॉर्न वेबसाईटवर टाकला तरुणीचा मोबाईल नंबर अन्

ठळक मुद्देसप्टेंबर महिन्यामध्ये तरुणीचा मोबाइल नंबर पॉर्न वेबसाईटवर एका अज्ञाताने टाकला होता.अचानक तरुणीला अज्ञात व्यक्तींकडून व्हिडिओ कॉल आणि अनेक अश्लील मेसेज येऊ लागले. चंदीगड सेक्टर - ९ मध्ये पोलिसात तक्रार दाखल केली होती.

चंदीगड - एका अज्ञात व्यक्तीने तीन पॉर्न वेबसाइटवर एका तरुणीचा मोबाइल नंबर टाकल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील पीडित तरुणी ही एक कॉलेज विद्यार्थिनी आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये तरुणीचा मोबाइल नंबर पॉर्न वेबसाईटवर एका अज्ञाताने टाकला होता. त्यानंतर अचानक तरुणीला अज्ञात व्यक्तींकडून व्हिडिओ कॉल आणि अनेक अश्लील मेसेज येऊ लागले. त्यामुळे तरुणी हैराण झाली होती. त्यानंतर वैतागलेल्या तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पीडित तरुणीचा मोबाइल नंबर हा २३ सप्टेंबरला पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर तरुणीने २५ सप्टेंबरला पोलिसात तक्रार दाखल केली. तिने चंदीगड सेक्टर - ९ मध्ये पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण चंदीगडच्या सायबर सेलमध्ये वर्ग करण्यात आली अशी पोलिसांनी माहिती दिली. मला व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट असणाऱ्या किमान ५० ते ६० लोकांनी व्हिडिओ कॉल आणि मेसेज केले आहेत. याबाबत अधिक माहिती काढली त्यावेळी माझा मोबाइल नंबर कुणीतरी पॉर्न वेबसाइटवर अपलोड केला असल्याची माहिती तरुणीने पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांना एका संशयितांची ओळख पटली असून त्याला लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पुढे पोलिसांनी दिली. 

Web Title: Unknown posted on porn website Mobile phone number of young girl and pornographic messages, video calls started appearing to girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.