अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडले, १६ लाखाची रक्कम लुटली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 08:51 PM2019-03-30T20:51:30+5:302019-03-30T20:54:53+5:30
सुरक्षा रक्षक नसल्याने एटीएम ची सुरक्षा रामभरोसे, एकाच रात्रीत दोन एटीएम फोडले
सुरक्षा रक्षक नसल्याने एटीएएम ची सुरक्षा रामभरोसे, एकाच रात्रीत दोन एटीएम फोडले
चाकण : खालूंब्रे ( ता.खेड ) येथे अज्ञात चोरट्यांनी बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएएम सेंटर गॅस कटरच्या साहाय्याने फोडून एटीएम मधील १५ लाख ९४ हजार १०० रुपयांची रोख रक्कम लुटून नेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना शनिवारी ( दि. ३० ) रात्री १.२५ ते पहाटे ३.५४ च्या दरम्यान घडली. अज्ञात चोरट्यांनी एटीएम सेंटर मध्ये उघड्या दरवाजातून आत प्रवेश करून एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने फोडून मशीनचे तीन लाखाचे नुकसान केले व मशीनमधील १५ लाख ९४ हजार १०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. याबाबत सचिन शिवकरण काळगे ( वय ३१, रा. फ्लॅट नं. ६, श्रीहरी बिल्डिंग, अश्विनी मार्केटजवळ, बापुजीबुवा नगर, थेरगाव, पुणे ३३ ) यांनी फिर्याद दिली आहे.
दरम्यान आज पहाटेच्या सुमारास खराबवाडी ( ता.खेड ) येथील काळुराम भिकाजी कड यांच्या जागेतील हि एटीएम मशीन चोरटयांनी फोडले, मात्र त्यातून किती रक्कम चोरीला गेली याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. विशेष म्हणजे या एटीएम सेंटर्सवर सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही, त्यामुळे या एटीएम केंद्रांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद कठोरे हे पुढील तपास करीत आहेत.
========================