उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण : पीडित तरुणी आणि वकिलाची प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 02:41 PM2019-08-01T14:41:38+5:302019-08-01T14:47:45+5:30
प्रकृती खालावली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
नवी दिल्ली - रायबरेली येथे झालेल्या अपघातातउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणी आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले होते. तर पीडित तरुणीची काकी आणि मावशी यांचा मृत्यू झाला होता. त्यांनतर हा अपघात कि घातपात या चर्चेने जोर धरला होता. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेली पीडित तरुणी आणि वकील यांची प्रकृती खालावली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील अतरुआ गावानजीक भीषण अपघात झाला असून या अपघातात उन्नाव सामूहिक बलात्कार पीडित तरुणी आणि वकील गंभीर जखमी झाले होते. तसेच बलात्कार पीडित तरुणीची काकी आणि मावशी यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून हा अपघात की घातपात अशी चर्चा सुरु झाली आहे.
रायबरेली येथे ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला होता.या अपघातात जखमी झालेल्यांवर लखनौ ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरु असून बलात्कार पीडित तरुणीची प्रकृती गंभीर होती. उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी पीडित तरुणीचे काका तुरुंगात असून त्यांना भेटण्यासाठी काकी, वकील आणि बलात्कार पीडित तरुणी रायबरेली येथे जात होते. त्यावेळी मागून आलेल्या ट्रकने कारला मागून येऊन जोरदार धडक दिली आणि हा अपघात झाला. सध्या किंग जॉर्ज युनिव्हर्सिटीद्वारे (केजीएमयू) मेडिकल बुलेटिन आज सकाळी ११ वाजता जाहिर करण्यात आलं. या अहवालानुसार पीडित तरुणी आणि वकील यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
King George Medical University hospital, Lucknow on #Unnao rape survivor & her lawyer admitted in the hospital: Their condition is critical. Both are on ventilator. But their condition is stable like yesterday. Their treatment is being done by team of experts at KGMU,free of cost
— ANI UP (@ANINewsUP) August 1, 2019
उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण : रायबरेली येथे झालेल्या अपघातात जखमी पीडित तरुणी आणि वकिलाची प्रकृती चिंताजनक https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) August 1, 2019