उन्नाव सामूहिक बलात्कार, हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 09:14 PM2020-01-02T21:14:53+5:302020-01-02T21:20:21+5:30
पाच आरोपींविरोधात हे आरोपपत्र आहे.
नवी दिल्ली - उन्नाव सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी उत्तर प्रदेशपोलिसांच्या एसआयटी पथकाने कोर्टात आरोपपत्र बुधवारी दाखल केले आहे. 23 वर्षीय पीडित तरुणीवर सामूहिक बलात्कार केलेल्या नराधमांनी जामिनावर सुटून तिला जाळले. 90 टक्के भाजलेल्या तरुणीचा डिसेंबर 2019मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनोद कुमार पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) याप्रकरणी तपास करत आहे. या अपथकाने कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. पाच आरोपींविरोधात हे आरोपपत्र आहे.
पाच आरोपींविरोधात बरेच पुरावे या पथकाने गोळा केले असून आरोपपत्र त्यावर आधारित आहे. 3 डिसेंबर 2019ला उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु असताना हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला. बलात्कार प्रकरणात जामिनावर सुटलेल्या आरोपींनी पीडितेला सुनावणीसाठी जात असताना जिवंत जाळले. यात ती 90 टक्के भाजली होती. त्यानंतर सुरुवातीला तिला उपचारासाठी लखनऊच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात हलविण्यात आले होते. सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. तिची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला.
उन्नाव पीडितेवर बंदोबस्तात अंत्यसंस्कार
नवी दिल्ली - उन्नाव सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी उत्तर प्रदेशपोलिसांच्या एसआयटी पथकाने कोर्टात दाखल केले आरोपपत्र https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) January 2, 2020