मैत्रिणीचा नंबर न दिल्याने पोलिसाचा तरुणावर अनैसर्गिक अत्याचार; चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 02:09 PM2021-11-23T14:09:35+5:302021-11-23T14:09:43+5:30
देवकरने त्याची चित्रफीत बनविली असून ती व्हायरल करण्याची धमकी दिली. प्रचंड मानसिक तणावाखाली गेलेल्या तरुणाने याची माहिती पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम व उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना दिली. या तरुणाच्या फिर्यादीनंतर देवकरला अटक करण्यात आली.
सांगली : मैत्रिणीचा नंबर दिला नाही म्हणून शहरातील २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणावर पोलिसाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. हा प्रकार २९ ऑक्टोबरला घडला. या अत्याचाराची क्लीप व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा अनैसर्गिक संभोग करण्याची मागणी या पोलिसाने केल्यावर तरुणाने पोलिसात धाव घेतली. हणमंत देवकर (३४, रा. इस्लामपूर) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
पीडित तरुण सध्या उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. २७ ऑक्टोबरच्या रात्री गस्तीसाठी संशयित पोलीस हणमंत देवकर आणि अन्य एक कर्मचारी नियुक्त होते. पहाटे तीनच्या सुमारास पीडित तरुण त्याच्या परगावच्या मैत्रिणीस भेटून आपल्या वसतिगृहाकडे निघाला होता. त्यावेळी त्याला देवकर व अन्य कर्मचाऱ्याने अडवून चौकशी करीत त्याचा मोबाइल नंबर लिहून घेतला होता.
मैत्रिणीच्या प्रेम प्रकरणाची माहिती दोघांच्या आई-वडिलांना देणार, अशी धमकी देत देवकरने पैशाची मागणी केली. तरुणाने मित्रांकडून चार हजार रुपये उसने घेत गुगल पेद्वारे देवकरला दिले. त्यानंतर , ‘तुझ्या मैत्रिणीचा नंबर दे. तिला माझ्यासोबत शरीरसंबंध करायला सांग,’ असा तगादा लावला. तरुणाने त्याला नकार दिल्यावर देवकरने त्याच्याकडेच शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. देवकर त्या तरुणाला जबरदस्तीने त्याच्या खोलीवर घेऊन गेला आणि अत्याचार केला.
घटनेची चित्रफित -
देवकरने त्याची चित्रफीत बनविली असून ती व्हायरल करण्याची धमकी दिली. प्रचंड मानसिक तणावाखाली गेलेल्या तरुणाने याची माहिती पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम व उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना दिली. या तरुणाच्या फिर्यादीनंतर देवकरला अटक करण्यात आली.