पनवेलमधील ‘त्या’ हत्याकांडाचा पनवेल पोलिसांकडून उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 01:45 PM2019-02-23T13:45:37+5:302019-02-23T13:47:03+5:30

पाच आरोपींचा अटक; लूटमारीच्या उद्देशाने केली हत्या

Unraveling the 'She' killer Panvel police from Panvel | पनवेलमधील ‘त्या’ हत्याकांडाचा पनवेल पोलिसांकडून उलगडा

पनवेलमधील ‘त्या’ हत्याकांडाचा पनवेल पोलिसांकडून उलगडा

googlenewsNext
ठळक मुद्देहत्या झालेल्या व्यक्तीचे नाव अमरजित सिंग रामेश्वर पाल (४०) असे आहे.पनवेल शहर पोलिसांनी त्या व्यक्तीची ओळख पटवून त्याची हत्या करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे.

पनवेल - शहरातील रेल्वेस्थानक परिसरात एका अनोळखी व्यक्तीची हत्या करून त्याला जाळण्यात आले होते. मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत असल्यामुळे त्याची ओळख पटविणे पोलिसांसाठी आव्हानात्मक होते. मात्र, पनवेल शहर पोलिसांनी त्या व्यक्तीची ओळख पटवून त्याची हत्या करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव अमरजित सिंग रामेश्वर पाल (४०) असे आहे.
शहर पोलिसांना छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह रेल्वे स्थानकालगत सापडला होता. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे, ईशान खरोटे व त्यांच्या पथकाने रेल्वे स्थानक परिसरात राहणाºया लोकांना मयत व्यक्तीचा फोटो दाखवून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू केले. या वेळी घटनास्थळापासून काही अंतरावर झाडाझुडपांमध्ये जळालेली राख पोलिसांना दिसली. ही राख विखुरली असता त्यात फोर्स १ सिक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीचे अमरजित सिंग नावाचे ओळखपत्र सापडले.
पोलिसांनी सिक्युरिटीकडे संपर्क साधला असता अमरजित उत्तर प्रदेश येथील असल्याचे समजले. या वेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी ा शोध घेतला असता मृतदेहाचा उर्वरित भाग अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी घनश्याम सुंदर चंद्राकार (२२, छत्तीसगड), मल्लू महादेव अप्पा पुजारी (कर्नाटक), विकास सीताराम कारंडे (२०, सातारा), मोईन बिजलाल खाटिक (२२, मध्य प्रदेश), जितेंद्र गणेश यादव (३०, उत्तर प्रदेश) यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी अमरजित सिंग याला मारल्याची कबुली दिली.
सिंगजवळचे पैसे काढून घेण्यासाठी, लूटमारीच्या उद्देशाने त्याला या पाच जणांनी जबर मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. आपण पकडले जाऊ या भीतीपोटी यांनी सिंगचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पूर्ण जळाला नसल्याने त्यांनी मृतदेहाचे दोन तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी टाकले. याप्रकरणी प्आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने २ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

 

 

Web Title: Unraveling the 'She' killer Panvel police from Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.