Air India विमानात माथेफिरू प्रवाशाचा कांड; इंजेक्शन देऊन बेशुद्ध करावे लागले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 01:47 PM2023-03-12T13:47:45+5:302023-03-12T13:48:23+5:30

काही वेळानंतर फ्लाईटच्या टॉयलेटमधून धूर येऊ लागल्याने फायर अलार्म वाजू लागला.

‘Unruly, aggressive’: London-Mumbai Air India passenger booked for smoking in toilet, misbehaviour | Air India विमानात माथेफिरू प्रवाशाचा कांड; इंजेक्शन देऊन बेशुद्ध करावे लागले

Air India विमानात माथेफिरू प्रवाशाचा कांड; इंजेक्शन देऊन बेशुद्ध करावे लागले

googlenewsNext

मुंबई - मूळ भारतीय असलेल्या अमेरिकन नागरिकाने एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये गोंधळ घातला. करुणाकान्त द्विवेदी असं या प्रवाशाचे नाव असून सहार पोलिसांनी त्याला अटक केली आहे. एअर इंडिया सिनिअर क्रू मेंबर शिल्पा मिश्रा यांच्या तक्रारीवरून द्विवेदी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मध्ये करुणाकान्त द्विवेदी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया AI 130 विमान १० मार्चला लंडन येथील वेळेनुसार, रात्री ९.३० वाजता मुंबईसाठी उडाण घेतले. काही वेळानंतर फ्लाईटच्या टॉयलेटमधून धूर येऊ लागल्याने फायर अलार्म वाजू लागला. शिल्पाने इतर क्रू मेंबर्ससह टॉयलेटचा दरवाजा उघडला तेव्हा द्विवेदी सिगरेट ओढत होते. द्विवेदी यांना समजावलं तरीही त्यांनी काहीही न ऐकता क्रू मेंबर्ससोबत वाद घातला. कसंतरी क्रू मेंबर्सने द्विवेदी यांच्याकडून सिगरेट आणि लायटर घेतले व पुन्हा जागेवर बसवले. 

प्रकरण इथेच शांत झाले नाही तर द्विवेदी थोड्या वेळाने अचानक उठले आणि फ्लाईटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. द्विवेदी यांच्या या कृत्यामुळे विमानातील सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात आला. एका प्रवाशाने द्विवेदी यांना दरवाजा उघडण्यापासून रोखले असता द्विवेदी यांनी त्या प्रवाशाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. द्विवेदीच्या या कारनाम्यामुळे सर्व प्रवाशी चिंतेत आले. 

इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले
क्रू मेंबर्स यांनी द्विवेदी यांना रोखण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना अपयश आले. त्यानंतर इतर प्रवाशांनी क्रू मेंबर्सची मदत करत द्विवेदीला पकडले. बळजबरीने द्विवेदी हातपाय बांधून त्यांना सीटवर बसवले. तरीही द्विवेदी विमानात हातपाय आपटायला लागले. द्विवेदी यांची अवस्था पाहून फ्लाईटमधील क्रू मेंबर्सने Diaz Tan Intra Insular नावाचं इंजेक्शन त्यांना दिले. त्यानंतर ते बेशुद्ध झाले. अखेर ११ मार्चला विमान जेव्हा मुंबई एअरपोर्टला पोहचले तेव्हा क्रू मेंबर्स आणि सुरक्षा रक्षकांनी द्विवेदी याच्याविरोधात सहार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. 
 

Web Title: ‘Unruly, aggressive’: London-Mumbai Air India passenger booked for smoking in toilet, misbehaviour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.