तुफान राडा! बाईकवरून दोन गट भिडले, थेट एकमेकांच्या जीवावर उठले; केली दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 09:13 AM2022-06-06T09:13:52+5:302022-06-06T09:15:19+5:30
Crime New : एका गावात तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर दगडफेक देखील करण्यात आली.
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका गावात तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं. बाईकवरून वाद झाला. पुढे तो वाद टोकाला गेला आणि दोन गट भिडले. एवढच नाही तर थेट एकमेकांच्या जीवावर उठल्याचा प्रकार पाहायला मिळाला. यानंतर दगडफेक देखील करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या कानपूरनंतर आता आग्रा येथे बाईकवरून दोन गटात वाद झाला. यानंतर ताजगंजच्या बसई परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली.
बसईमध्ये रस्त्याचं काम सुरू होतं. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुला टाइल्स पडल्या होत्या. एक तरुण बाईकवरून तेथून जात होता. तेव्हाच ती बाईक स्लीप झाली आणि एका व्यक्तीला तिने धडक दिली. यानंतर यावरून वादावादी सुरू झाली, वादावादीचं रुपांतर दगडफेकीत झालं आणि दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर दगड फेकण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
कानपूरमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेमागे कट असल्याचं आता उघड झालं आहे. या हिंसेचं PFI कनेक्शन असल्याचं समोर येत आहे. ज्या लोकांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे PFI शी संबंधित काही कागदपत्रं सापडली आहे. या हिंसेचा मास्टरमाईंड असलेल्या जफर हाशमीच्या कार्यालयात देखील PFI चे स्टुडेंट विंग CFI ची काही कागदपत्रं मिळाली आहे. या घटनेमुळ परिसरात तणाव निर्माण झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.