नवरीने सासरी जाऊन केला असा कारनामा, नवरदेवाला बेशुद्ध करून प्रियकरासोबत झाली गायब...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 01:39 PM2022-09-02T13:39:28+5:302022-09-02T13:40:01+5:30
UP Luteri Dulhan Case: 2 लाख रूपयांची कॅश आणि लाखो रूपये किंमतीचे दागिने चोरी करून प्रियकरासोबत फरार होणाऱ्या नवरीचं कृत्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं.
UP Luteri Dulhan Case: उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये 'लुटेरी दुल्हन'ने सासरच्या लोकांना झोपेच्या गोळ्या दिल्या आणि त्यांना बेशुद्ध करून सव्वा दोन लाख रूपये कॅश आणि लाखो रूपयांचे दागिने घेऊन प्रियकरासोबत फरार झाली. 2 लाख रूपयांची कॅश आणि लाखो रूपये किंमतीचे दागिने चोरी करून प्रियकरासोबत फरार होणाऱ्या नवरीचं कृत्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं. महिलेचं लग्न चार महिन्यांआधीच झालं होतं. पोलिसांनी पीडित परिवाराच्या तक्रारीवरून नवरीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नव्या नवरीच्या कृत्याची ही हैराण करणारी घटना यूपीच्या संभल जिल्ह्यातील सराय भागातील आहे. नवरी मनीषाचा पती अंकुशनुसार, गेल्या बुधवारच्या सायंकाली मनीषाने घरातून पळून जाण्यासाठी नशेचा पदार्थ मिक्स करून पूर्ण परिवाराला जेवण दिलं. जेवण झाल्यावर नवरदेवाला नशेच्या गोळ्या मिक्स केलेलं खास दूध दिलं. जेव्हा सगळे लोक बेशुद्ध झाले तेव्हा मनीषाने घरातील कपाटात ठेवलेले दोन लाख रूपये कॅश आणि लाखो रूपयांचे दागिने लंपास केले. ती दुसऱ्या मजल्यावरून साडीच्या मदतीने खाली उतरली. त्यानंतर तिच्या प्रियकरासोबत फरार झाली.
'लुटेरी दुल्हन' मनीषा आणि तिच्या प्रियकराचा हा कारनामा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मनीषा आणि तिचा प्रियकर पळून जाताना दिसत आहेत. 'लुटेरी दुल्हन' मनीषाचा प्रियकर मध्य प्रदेशातील शिवपुरीचा राहणारा असल्याचं सांगितलं जात आहे.
मनीषाचा पती अंकुशने सांगितलं की, 4 महिन्यांआधी त्याचं लग्न झालं होतं. पण लग्नानंतर मनीषाचं त्याच्या परिवारासोबतचं वागणं बरोबर नव्हतं. मनीषा घरातील कोणत्याही कामात रस घेत नव्हती. पण गेल्या बुधवारी मनीषाचं वागणं अचानक बदललं. मनीषाने पूर्ण परिवारासाठी जेवण तयार केलं. इतकंच नाही तर मनीषाने त्याच्यासाठी दूधही मागवलं होतं. परिवारातील लोकांना या तिच्या अचानक वेगळ्या वागण्याबाबत काही समजलं नाही. जर त्यांना जराही शंका आली असती तर मनीषाचा प्लान फेल झाला असता.
पोलीस अधीक्षक आलोक जयस्वाल यांनी सांगितलं की, हल्लू सरायचा राहणारा अंकुशने तक्रार दिली होती की, त्याची पत्नी दोन लाख रूपये कॅश आणि लाखो रूपयांचे दागिने घेऊन तिच्या प्रियकरासोबत फरार झाली. पोलिसांनी अंकुशच्या तक्रारीवरून आरोपी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे आणि प्रकरणाची चौकशी केली जात आहे.