DNA टेस्टमधून आजोबाच निघाला नातीचा वडील, महिलेचा वैरी बनला परिवार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 11:06 AM2023-07-27T11:06:52+5:302023-07-27T11:07:25+5:30

Crime News : महिलेवर अनेकदा जबरदस्ती करण्यात आली. सासऱ्याच्या अत्याचाराची जेव्हा तिने पोलिसात तक्रार केली तेव्हा तिचं कुणी ऐकलं नाही. तिच्यासोबत जबरदस्ती सुरूच होती.

UP Crime News : After DNA test of father-in-law family became enemy of women appealed for justice | DNA टेस्टमधून आजोबाच निघाला नातीचा वडील, महिलेचा वैरी बनला परिवार!

DNA टेस्टमधून आजोबाच निघाला नातीचा वडील, महिलेचा वैरी बनला परिवार!

googlenewsNext

Crime News : उत्तर प्रदेशच्या बस्तीमध्ये एका महिलेने आपला सासरा आणि दीरावर जबरदस्ती व मारहाण केल्याचा आरोप केला जो तिच्यासाठी घातक ठरत आहे. पीडित महिलेचं 9 वर्षाआधी लग्न झालं होतं. पती मानसिक आजारी होता. ज्याचा फायदा सासरा आणि दीराने घेतला.

महिलेवर अनेकदा जबरदस्ती करण्यात आली. सासऱ्याच्या अत्याचाराची जेव्हा तिने पोलिसात तक्रार केली तेव्हा तिचं कुणी ऐकलं नाही. तिच्यासोबत जबरदस्ती सुरूच होती. पोलिसांनी महिलेच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यावर सासरा आणि दीराने तिच्यावर आणखी अत्याचार केले.

पीडितेने सांगितलं की, तिने तिच्यावर रोज होत असलेल्या अत्याचांराना कंटाळून त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता. महिलेने सासरा जे रोज करत होता ते एका व्हिडिओत रेकॉर्ड केलं आणि हे जगासमोर आणलं. यानंतर पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवून घ्यावीच लागली. 2022 मध्ये सासरा आणि दीराविरोधात पोलिसांनी रेपचा गुन्हा दाखल केला.

नंतर या घटनेला नवीन वळणं मिळालं जेव्हा महिलेने तिची एक मुलगी सासऱ्याची असल्याचं सांगितलं. पीडितेने डीएनए टेस्टची मागणी केली. 26 सप्टेंबर 2022 ला महिला आणि तिच्या सासऱ्याच्या डीएनए टेस्टचा रिपोर्ट आला. ज्यात मुलीचा डीएनए सासऱ्यासोबत मॅच झाला. म्हणजे महिलेच्या तीन मुलींपैकी एका मुलीचा बायोलॉजिकल वडील तिचा सासरा आहे. सासरा आणि दीराला रेपच्या केसमध्ये पोलिसांनी तुरूंगातही टाकलं.

सासरा सध्या तुरूंगात आहे. पण दीर जामीनावर बाहेर आला आहे. महिलेचा आरोप आहे की, दीर अजूनही तिच्याकडे वाईट नजरेने बघतो. तुरूंगातून आल्यावर त्याने कुटुंबियांनी तिला मारहाण केली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तेच पोलिसांनी पीडितेवरच गुन्हा दाखल केला. आता ती न्यायासाठी फिरत आहे.

पीडित महिलेने सांगितलं की, पतीकडून तिला दोन मुली झाल्या तर सासऱ्याकडून एक मुलगी झाली. आता तिच्यासमोर प्रश्न आहे की, तीन मुलींची जीवन कसं सुधारायचं. तेच सासरचे लोक तिला त्रास देतात. अशात तिला न्यायाची गरज आहे. पोलिसांनी सांगितलं की, चौकशी सुरू आहे त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.

Web Title: UP Crime News : After DNA test of father-in-law family became enemy of women appealed for justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.