Hidden Camera मधून रेकॉर्ड करायचे कपल्सचा अश्लील व्हिडिओ अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 04:40 PM2022-10-22T16:40:24+5:302022-10-22T16:40:53+5:30

उत्तर प्रदेशातील नोएडा येथील मामुरा गावात असलेल्या oyo हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीतील चार जणांना फेज-3 पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

up crime news blackmail by making obscene videos in oyo hotel noida four arrested delhi | Hidden Camera मधून रेकॉर्ड करायचे कपल्सचा अश्लील व्हिडिओ अन्...

Hidden Camera मधून रेकॉर्ड करायचे कपल्सचा अश्लील व्हिडिओ अन्...

Next

उत्तर प्रदेशातील नोएडा येथील मामुरा गावात असलेल्या oyo हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीतील चार जणांना फेज-3 पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशीत असे आढळून आले की संबंधित लोक बनावट कॉल सेंटर देखील चालवत असत, ज्याद्वारे त्यांनी स्वस्तात आयफोन देण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक केली आहे. याप्रकरणात आरोपी पंकज, अब्दुल बहव, अनुराग आणि विष्णू यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींकडून ११ लॅपटॉप, २१ मोबाईल फोन, २२ एटीएम कार्ड, एक पॅनकार्ड, २६ सिमकार्ड, विविध कंपन्यांचे ४९ बनावट ओळखपत्र, बनावट आधार कार्ड इत्यादी जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीचा साथीदार सौरभ पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून घटनास्थळावरून पसार झाला. सध्या त्याचाही शोध सुरू आहे. 

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
नोएडाच्या फेज 3 पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. एखादं कपल हॉटेलमध्ये वास्तव्याला आलं की त्यांच्या वैयक्तिक क्षणांचे व्हिडिओ हीडन कॅमेराच्या सहाय्यानं रेकॉर्ड केले जायचे. नंतर त्यांना हेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केलं जात होतं. या प्रकरणाच्या तपासात दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांनी चौकशीदरम्यान खुलासा केला. ते काही दिवसांपूर्वी हॉटेलच्या खोलीत थांबले होते आणि तिथं कॅमेरा बसवला होता. नंतर संबंधित खोलीत एखादं जोडपं थांबलं की त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करुन त्यांना ब्लॅकमेल केलं जात होतं. 

तीन बनावट कॉल सेंटर
यासोबतच बँकेची कागदपत्रे, एटीएम, सिमकार्ड अशा बनावट वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या आणखी एका व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींनी अलीकडेच एक कॉल सेंटर चालवणाऱ्या अनुराग नावाच्या व्यक्तीलाही अशीच किट विकली होती. अनुराग तीन अनधिकृत कॉल सेंटर चालवत होता आणि सवलतीच्या दरात आयफोन विकत होता.

११ लॅपटॉप आणि २१ मोबाईल जप्त
अनुरागलाही अटक करण्यात आली असून लॅपटॉपसह विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपींकडून ११ लॅपटॉप, २१ मोबाईल फोन, २२ एटीएम कार्ड, एक पॅन कार्ड, २६ सिमकार्ड, विविध कंपन्यांचे ४९ बनावट ओळखपत्र, बनावट आधार कार्ड इत्यादी जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीचा साथीदार सौरभ पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करुन घटनास्थळावरून पसार झाला. त्याचाही शोध घेतला जात आहे. 

Web Title: up crime news blackmail by making obscene videos in oyo hotel noida four arrested delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.