UP Crime News: उन्नावमध्ये आढळला बेपत्ता तरुणीचा मृतदेह, सपा नेत्याच्या मुलावर हत्येचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 10:53 AM2022-02-11T10:53:08+5:302022-02-11T10:53:51+5:30
UP Crime News:समाजवादी पक्षाच्या माजी मंत्र्याचा मुलगा राजोल सिंह याने तरुणीला जबरदस्तीने सोबत नेले होते, असे मृत मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले आहे.
उन्नाव:उत्तर प्रदेशपोलिसांना उन्नावमध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडला आहे. या तरुणीच्या हत्येचा आरोप समाजवादी पक्षाचे माजी मंत्री फतेह बहादूर सिंह यांचा मुलगा राजोल सिंह याच्यावर असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीच्या नावे असलेल्या एका प्लॉटमध्ये हा मृतदेह जमिनीत गाडण्या तआला होता.
Unnao, UP: Police recovers dead body of a missing woman from plot allegedly owned by the accused
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 10, 2022
"FIR was registered on Dec 8 and the accused was later arrested. Following investigation, the dead body was recovered. The post mortem will be done," says ASP Shashi Shekhar Singh https://t.co/zd1Lzvmd5ipic.twitter.com/ewZ2WoGxmL
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. एएसपी शशी शेखर सिंह यांनी सांगितले की, 8 डिसेंबर रोजी या प्रकरणी एफआयआर नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली होती. तपासानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. आता शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर अधिक माहिती समोर येईल.
मृतदेह ताब्यात आल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांची अवस्था दयनीय झाली आहे. मृत मुलीच्या आईने सांगितले की, राजोल सिंहने तिच्या मुलीला जबरदस्तीने सोबत नेले होते. इतके दिवस पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही. एएसपी उन्नाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे वय सुमारे 22 वर्षे आहे. पोलिसांची दोन पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने अनेक खुलासे केले आहेत.