मित्राची हत्या करून त्याच्या पत्नीला आपल्यासोबत ठेवलं, दोन वर्षांनी तिचीही केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 10:13 AM2022-07-02T10:13:31+5:302022-07-02T10:14:06+5:30

UP Crime News : महिला तिच्या दोन मुलांसोबत त्याच्यासोबत पत्नी बनून राहत होती. महिलेच्या परिवाराने दोन वर्षापूर्वी ती आणि तिच्या मुलांची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

UP Crime News : Man's kept his Friend's wife as wife two years killed her too | मित्राची हत्या करून त्याच्या पत्नीला आपल्यासोबत ठेवलं, दोन वर्षांनी तिचीही केली हत्या

मित्राची हत्या करून त्याच्या पत्नीला आपल्यासोबत ठेवलं, दोन वर्षांनी तिचीही केली हत्या

googlenewsNext

UP Crime News : उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये एका नाल्यात 22 जूनला एका महिलेचा मृतदेह आढळून आला. चौकशीतून समोर आलं की, हा मृतदेह राजस्थानमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा आहे. तिला दोन मुलं आहेत. तिची हत्या तिच्या प्रियकराने गोळी झाडून केली होती. महिलेचा प्रियकरा ट्रॅव्हल एजन्सीमध्ये ड्रायव्हर होता. तो इटावाच्या ऊसराहार येथे राहणारा होता. महिला तिच्या दोन मुलांसोबत त्याच्यासोबत पत्नी बनून राहत होती. महिलेच्या परिवाराने दोन वर्षापूर्वी ती आणि तिच्या मुलांची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी सांगितलं की, गजेंद्र नावाची व्यक्ती आपली पत्नी मिथिलेशसोबत नोएडामध्ये राहत होती. एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये गजेंद्र आणि सतीश दोघेही ड्रायव्हर होते. दोघांची मैत्री झाली. त्यानंतर सतीशचं अफेअर गजेंद्रची पत्नी मिथिलेशसोबत सुरू झालं. यादरम्यान सतीश गजेंद्र आणि त्याची पत्नी मिथिलेश इटावाला फिरायला गेले. तिथे सतीश यादवने मिथिलेशसोबत मिळून तिचा पती गजेंद्रला दारू पाजली आणि नंतर त्याला गाडीत बसवून, सीट बेल्ट बांधून गाडी तलावात ढकलली.

गजेंद्रचा मृतदेह तलावात सापडला. ज्यानंतर तलावात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर मिथिलेश दोन महिन्यांसाठी तिच्या सासरी राजस्थानच्या झुंझनू इथे गेली. तिथून दोन्ही मुलांना घेऊन कुटुंबियांना न सांगता ती सतीशसोबत इटावाला पोहोचली. यानंतर सतीश आणि मिथिलेश पती-पत्नीसारखे राहू लागले होते. दोन वर्षांनी सतीशला मिथिलेशवर संशय होऊ लागला होता की, तिचं कुठेतरी अफेअर सुरू आहे. त्यानंतर सतीश मिथिलेशला पूजेच्या बहाण्याने मंदिराच्या जवळच्या जंगलात घेऊन गेला आणि तिच्यावर गोळी झाडली. त्यानंतर तिचा मृतदेह नाल्यात फेकला. मृत महिला नवरीसारखी सजली होती. 

पोलिसांनी सांगितलं की, सतीश यादवने मिथिलेशचा पती गजेंद्रची हत्या केली होती. ज्यात मिथिलेशने त्याला साथ दिली होती. मग सतीश आणि मिथिलेश पती-पत्नीसारखे राहू लागले होते. यानंतर सतीशने संशयावरून मिथिलेशचीही हत्या केली. त्याला अटक केली आहे.

Web Title: UP Crime News : Man's kept his Friend's wife as wife two years killed her too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.