UP Crime News: नवी नवरी पहिल्या दिवसापासूनच चावा घेऊ लागली, पती हादरला; पोलिस ठाण्यात केला मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 09:31 IST2022-08-22T09:23:23+5:302022-08-22T09:31:02+5:30
टप्पल पोलीस ठाणे परिसरातील खंडेया गावातील हा प्रकार आहे. पीडित तरुणाने पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

UP Crime News: नवी नवरी पहिल्या दिवसापासूनच चावा घेऊ लागली, पती हादरला; पोलिस ठाण्यात केला मोठा गौप्यस्फोट
उत्तर प्रदेशच्या अलीगढजिल्ह्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. नव्या नवरीने पतीला दाताने चावून जखमी केले. पती तसाच जखमी अवस्थेत पोलिस ठाण्यात पोहोचला आणि तिच्याविरोधात तक्रार दाखल केली. या तरुणाने पत्नी अनेक प्रकारची नशाबाजी करते, यातून ती दंगा आणि मारहाणही करते. यावर पोलिसांनी तपास करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
टप्पल पोलीस ठाणे परिसरातील खंडेया गावातील हा प्रकार आहे. पीडित तरुणाने पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. ती दारु पिते, त्याचबरोबर भांग देखील पिते. नशा केल्यानंतर ती घरात गोंधळ घालते. एका रात्री तिने रात्री १२ वाजता त्याला झोपेतून उठविले, यानंतर भांडण उकरून काढले आणि बांगड्या फोडल्या. यानंतर तिने तिचे डोके भिंतीवर आपटले, असे म्हटले आहे.
याचदरम्यान तरुणीने त्याच्या छातीवर आणि हातावर चावा घेतला आणि जखमी केले. तसेच सासऱ्यांना देखील ठार मारण्याची धमकी दिली. मोठमोठ्या आवाजात गोंधळ घालू लागली. यामुळे आम्ही ११२ नंबरला फोन केला. पोलीस आले. खूप त्रासलो आहे. आमची तिच्यापासून सुटका करावी, अशी विनवणी या तरुणाने पोलिसांना केली आहे.
सीओ आरके सिसोदिया यांनी सांगितले की, पीडित तरुणाने आपल्या नवविवाहित पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी तरुणाच्या तक्रारीच्या आधारे टप्पल पोलिस स्टेशनने तपास सुरू केला आहे. तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.