UP Crime News: गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार, 3 महिन्यांचे अर्भक घेऊन कुटुंबीय पोलीस ठाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 02:36 PM2022-09-21T14:36:24+5:302022-09-21T14:38:48+5:30

UP Crime News: बरेलीत गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार करुन गर्भपात केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

UP Crime News: Pregnant woman gang-raped, in Bareilly | UP Crime News: गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार, 3 महिन्यांचे अर्भक घेऊन कुटुंबीय पोलीस ठाण्यात

UP Crime News: गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार, 3 महिन्यांचे अर्भक घेऊन कुटुंबीय पोलीस ठाण्यात

Next

Bareilly Gangrape: उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एका गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.  धक्कादायक बाब म्हणजे, बलात्कारामुळे तिचा तिसऱ्या महिन्यातच गर्भपात झाला. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना विसारतगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. या घटनेनंतर पीडित महिलेचे नातेवाईक 3 महिन्यांच्या अर्भकाला घेऊन एसएसपी कार्यालयात पोहोचले. नातेवाईक अर्भकासह आल्यामुळे पोलिस स्टेशनमध्ये एकच खळबळ उडाली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गावातील 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार
या घटनेनंतर संपूर्ण गावात संतापाची लाट पसरल आहे. सध्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. घटनेनंतर तिन्ही आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आरोपी मोकाट फिरत असून, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. तसेच, आरोपी केस मागे घेण्यासाठी धमकावत असल्याची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

पीडितेच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना एसपी देहत राजकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, महिलेने गावातील 3 जणांवर सामूहिक बलात्कार आणि गर्भपाताचा आरोप केला आहे. या प्रकरणी 3 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासात गावातील शेतात उडीद तोडण्याचा वाद समोर आला आहे. आता महिलेच्या तक्रारीवरुन आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: UP Crime News: Pregnant woman gang-raped, in Bareilly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.