'पोलीस आमचा एन्काऊंटर करतील, आम्हाला वाचवा'; पोस्टर घेऊन चोर पोहोचले पोलीस ठाण्यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 03:06 PM2022-04-04T15:06:31+5:302022-04-04T15:07:32+5:30

उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांमध्ये आता योगी सरकार आणि पोलिस प्रशासनाचा धाक स्पष्टपणे दिसून येऊ लागला आहे. मैनपुरीमध्ये दोन दरोडेखोर पोलिसांसमोर शरण आले आहेत.

up encounter fear robbers surrendered in mainpuri cm yogi adityanath | 'पोलीस आमचा एन्काऊंटर करतील, आम्हाला वाचवा'; पोस्टर घेऊन चोर पोहोचले पोलीस ठाण्यात!

'पोलीस आमचा एन्काऊंटर करतील, आम्हाला वाचवा'; पोस्टर घेऊन चोर पोहोचले पोलीस ठाण्यात!

Next

मैनपुरी-

उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांमध्ये आता योगी सरकार आणि पोलिस प्रशासनाचा धाक स्पष्टपणे दिसून येऊ लागला आहे. मैनपुरीमध्ये दोन दरोडेखोर पोलिसांसमोर शरण आले आहेत. दोन्ही दरोडेखोर आत्मसमर्पण करण्यासाठी एसपी कार्यालयात पोहोचले होते. मैनपूरमध्ये पकडलेल्या या चोरांच्या हातात बॅनरही होते. 'पोलीस आमचे एन्काउंटर करतील. आम्हाला वाचवा', 'आम्ही दरोडेखोर आहोत, आम्हाला तुरुंगात पाठवा', असे पोस्टरवर लिहून चोर पोलिसांना शरण आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी मैनपुरीच्या किश्नी भागात दरोडा टाकला होता. तेव्हापासून पोलीस आणि तपास पथक त्यांच्या मागावर होते. उत्तर प्रदेशात योगी सरकारच्या २.० मध्ये प्रशासनाचा धाक दाखवणारे हे चित्र असल्याचे बोलले जात आहे. 

योगी २.० मध्ये बुलडोझरचीही भीती
योगी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये आता बुलडोझरची भीतीही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २८ मार्च रोजी सरकार स्थापन झाल्यानंतर १४ दिवसांत बुलडोझरच्या भीतीने ५० हून अधिक गुन्हेगारांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली होती. अशी अनेक प्रकरणे समोर आली ज्यात आरोपी फरार होता, मात्र त्याच्या घराबाहेर बुलडोझर पोहोचताच आरोपीने आत्मसमर्पण केले.

युपी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर सतत पळ काढत असतो. कायदेशीर प्रक्रिया आणि वॉरंटनंतरही जेव्हा गुन्हेगार शरण येत नाही, तेव्हा त्याच्या गुन्ह्यातून कमावलेल्या मालमत्तेवर जप्तीचे आदेश घेऊन बुलडोझर चालवण्याची कारवाई केली जाते. यूपीच्या ADG कायदा आणि सुव्यवस्थेनुसार, यासाठी गुन्ह्यातून मिळालेल्या पैशातून मालमत्ता बनवणे आवश्यक आहे. तरच कारवाई केली जाते.

शामलीमध्ये १७ गुन्हेगांनी केलं आत्मसमर्पण
यूपीमध्ये योगी सरकार परतल्यानंतर शामलीमध्ये चकमकीच्या भीतीने २३ मार्च रोजी सुमारे १८ गुन्हेगारांनी आत्मसमर्पण केले. शामली पोलिसांसमोर शरणागती पत्करलेल्या १८ गुन्हेगारांमध्ये अनेक गुंड आणि गाय तस्करांचा समावेश होता. पोलिसांसमोर कधीही गुन्हा करणार नाही, अशी शपथही या चोरट्यांनी घेतली होती. या सर्व गुन्हेगारांनी आत्मसमर्पण करत पोलीस स्टेशन गाठले आणि एसएचओसमोर हजर झाल्यानंतर आत्मसमर्पण केले. पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केलेल्या गुन्हेगारांमध्ये सनवर, मंजूर हसन, उम्मेद, मशरूफ, अकबर, सलीम, नौशाद, ताहिर, सुहेब, गुलबहार, मुस्तकीम, मेहराब, नौशाद, सलीम, इंतेझार, शहजाद, अब्दुलगनी आणि नौशाद यांचा समावेश आहे.

Web Title: up encounter fear robbers surrendered in mainpuri cm yogi adityanath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.