लग्न होत नसल्याने प्रेयसी आणि प्रियकराने कापली नस, मग स्वत:च फोन करून म्हणाले - वाचवा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 01:45 PM2023-04-17T13:45:15+5:302023-04-17T13:45:42+5:30

फिरोजाबादच्या सिरसागंज गांधी मंडीमध्ये राहणारा इंजिनिअरचं एका तरूणीसोबत अफेअर सुरू होतं. तरूणी बंगळुरूमध्ये नोकरी करत होती. पण कोरोनापासून तिचं घरून काम सुरू होतं.

UP Firozabad engineer lover graduate girlfriend suicide attempt | लग्न होत नसल्याने प्रेयसी आणि प्रियकराने कापली नस, मग स्वत:च फोन करून म्हणाले - वाचवा...

लग्न होत नसल्याने प्रेयसी आणि प्रियकराने कापली नस, मग स्वत:च फोन करून म्हणाले - वाचवा...

googlenewsNext

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये एक प्रेयसी आणि तिच्या प्रियकराने त्याची हाताची नस कापली. असं सांगितलं गेलं की, इंजिनिअर प्रियकराला आपल्या पदवीधर प्रेयसीसोबत लग्न करायचं होतं. पण तरूणीचं लग्न दुसरीकडे ठरलं होतं. याने दोघेही नाराज होते. सोबत राहता येणार नाही हे बघून दोघांनी सोबत मरण्याचा प्रयत्न केला. दोघांचीही स्थिती गंभीर आहे.

फिरोजाबादच्या सिरसागंज गांधी मंडीमध्ये राहणारा इंजिनिअरचं एका तरूणीसोबत अफेअर सुरू होतं. तरूणी बंगळुरूमध्ये नोकरी करत होती. पण कोरोनापासून तिचं घरून काम सुरू होतं. यादरम्यान दोघांमध्ये प्रेम झालं आणि दोघांनी सोबत राहण्याची शपथ घेतली. पण यादरम्यान तरूणीचं दुसरीकडे लग्न जुळलं.

तरूण आणि तरूणीला लग्न करायचं होतं. पण दोघांचेही परिवार यासाठी तयार नव्हते. अशात तरूण आणि तरूणी रविारी सायंकाळी शिकोहाबादच्या बांके बिहारी हॉटेलमध्ये गेले, तिथे त्यांनी रूम घेतली. शिकोहाबाद पोलिसांनी सांगितलं की, दोघांनी पेपर कट करणाऱ्या चाकूने हातांच्या नसा कापल्या.

तरूणाने तर त्याच्या गळ्याची नसही कापली. शरीरातून रक्त निघताना बघून तो घाबरला. त्याने त्याचा मित्र रिंकू याला फोन केला आणि त्याला सांगितलं की, त्याने नस कापून घेतली आहे. पण त्याला मरायचं नाहीये. रिंकू लगेच हॉटेलमध्ये आला आणि त्याने दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

दोघांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना मेडिकल कॉलेज आगरा येथे रेफर केलं गेलं. पोलिसांनी सांगितलं की, नस कापण्यासाठी वापरलेला चाकू ताब्यात घेतला आहे. पुढील चौकशी सुरू आहे.

Web Title: UP Firozabad engineer lover graduate girlfriend suicide attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.