तरूणीने लग्न करण्यास दिला नकार, माथेफिरू तरूणाने कापलं तिचं बोट; गाकवऱ्यांनी दिला चोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 03:12 PM2022-01-24T15:12:29+5:302022-01-24T15:12:55+5:30
UP Crime News : पोलिसांनी कसंतरी संतापलेल्या लोकांना शांत केलं आणि आरोपीला अटक करून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तरूणीची स्थिती स्थिर आहे.
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गोरखपूरमधून (Gorakhpur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका माथेफिरू तरूणाने लग्नास नकार देणाऱ्या एका तरूणीची चाकूने बोटं कापली. पीडित तरूणीने आरडा-ओरड केल्यावर गावातील लोक जमा झाले. त्यांनी तरूणाला पकडलं आणि त्याला चोप दिला. घटनेची सूचना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले तर आक्रामक गावकऱ्यांनी दगडफेक केली. पोलिसांनी कसंतरी संतापलेल्या लोकांना शांत केलं आणि आरोपीला अटक करून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तरूणीची स्थिती स्थिर आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आरोपी गौतम गौड(२३) छोटका सोनबरसा गावातील राहणारा आहे. त्याने एका तरूणीला लग्नासाठी मनवण्याचा प्रयत्न केला. पण तरूणीने लग्नास नकार दिला. यावरून नाराज झालेल्या गौतमने तरूणीवर चाकूने हल्ला करत तिचं बोट कापलं.
बोट कापल्याने वेदनेत तरूणी जोरात ओरडली. तिच्या आवाजाने गावातील लोक तिथे जमा झाले आणि त्यांनी आरोपीला धरलं. त्यानंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी आरोपीला चांगलाच चोप दिला. दरम्यान कुणीतरी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. आरोपी तरूणाला सोडवण्यासाठी पोलीस तिथे आले. पण गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. नंतर पोलिसांन कसंतरी गावकऱ्यांना समजावलं आणि आरोपीला अटक केली. नंतर पोलिसांनी तरूणीच्या कुटुंबियांकडून देण्यात आलेल्या लिखित तक्रारीवरून आरोपीवर कारवाई करत त्याला तुरूंगात टाकलं.