सर्वात मोठा बँक फ्रॉड! चोरट्यांनी लंपास केले तब्बल १४६ कोटी रुपये; १८ महिन्यांपासून सुरू होतं प्लानिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 02:43 PM2022-11-02T14:43:33+5:302022-11-02T14:44:49+5:30

१८ महिन्यांत एक कोटी रुपये खर्च करुन तीन हॅकर्स, सहा उपकरणं, तीन कीलॉकर सॉफ्टवेअर आणि तीन बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने तब्बल १४६ कोटी रुपयांच्या बँक फ्रॉडची घटना उघडकीस आली आहे.

up govt employees among five held for cheating bank of 146 crores | सर्वात मोठा बँक फ्रॉड! चोरट्यांनी लंपास केले तब्बल १४६ कोटी रुपये; १८ महिन्यांपासून सुरू होतं प्लानिंग

सर्वात मोठा बँक फ्रॉड! चोरट्यांनी लंपास केले तब्बल १४६ कोटी रुपये; १८ महिन्यांपासून सुरू होतं प्लानिंग

Next

१८ महिन्यांत एक कोटी रुपये खर्च करुन तीन हॅकर्स, सहा उपकरणं, तीन कीलॉकर सॉफ्टवेअर आणि तीन बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने तब्बल १४६ कोटी रुपयांच्या बँक फ्रॉडची घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेश सहकारी बँकेच्या लखनौ मुख्यालयाचा सर्व्हर हॅक करून हा घोटाळा करण्यात आला आहे. ऑनलाइन RTGS द्वारे फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या संघटित टोळीच्या दोन सूत्रधारांसह एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बँकर्सच्या संगनमताने ही टोळी चालवणाऱ्या सायबर गुन्हेगारी टोळीचा उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष टास्क फोर्सने पर्दाफाश केला आहे. हे प्रकरण १४६ कोटींच्या ऑनलाइन फसवणुकीचं असल्याचं उघडकीस आलं आहे. गेल्या १८ महिन्यात ३ हॅकर्स, ६ डिव्हाईस, ३ कीलॉगर सॉफ्टवेअर, ३ बँक अधिकारी यांच्या मदतीने सुमारे एक कोटी रुपये खर्च करून हे प्लानिंग केलं जात होतं. यामध्ये नुकतेच लखनौ येथील उत्तर प्रदेश सहकारी बँक लिमिटेडचे ​​मुख्यालयाचे सर्व्हर हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे.

२ मास्टरमाइंडसह ५ आरोपींना अटक
ठगांनी बँक मॅनेजर आणि कॅशियरचे लॉगिन आयडी पासवर्ड मिळवले होते. त्यानंतर रिमोट अॅक्सेस सिस्टमवर NAD विभागात उघडलेल्या ७ खात्यांमध्ये ८ वेला व्यवहार झाले. ज्यामध्ये १४६ कोटींची आरटीजीएस करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी सायबर गुन्हेगारांच्या संघटित टोळीच्या २ मास्टरमाइंडसह ५ आरोपींना लखनौ येथून अटक करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री यूपी एसटीएफचे प्रमुख अतिरिक्त महासंचालक आयपीएस अमिताभ यश ही सर्व माहिती दिली.

आरोपींकडून STF ने १ बँक ओळखपत्र, २५ संच आधार कार्ड आणि स्वाक्षरी केलेला कोरा धनादेश, २५ सेट रहिवासी प्रमाणपत्र आणि भारतीय नॉन-ज्युडिशियल स्टॅम्प प्लेन, ८ मोबाईल फोन, ७ एटीएम कार्ड, २५ सेट हायस्कूल आणि मूळ गुणपत्रिका, प्रमाणपत्रे, एक कार आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्वांना ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी लखनौच्या बन मंडी तिराहा येथून अटक करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षी १६ ऑक्टोबर रोजी सहाय्यक महाव्यवस्थापक अजय कुमार त्रिपाठी यांनी सायबर क्राइम पोलिस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल केला होता. ज्यामध्ये १५ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३.४५ ते ३.१५ या दरम्यान विभागात कार्यरत असलेल्या जिल्हा सहकारी बँकांच्या ७ खात्यांमधून सहकारी बँकेचे ८ व्यवहार झाले. ज्यामध्ये विकास पांडे, असिस्टंट कॅशियर आणि मेवलाल मॅनेजर यांच्या CBS आयडीवरून RTGS द्वारे इतर बँक ICICI आणि HDFC च्या खात्यांमध्ये १४६ कोटी रुपये अनधिकृतपणे ट्रान्सफर करण्यात आले होते.

Web Title: up govt employees among five held for cheating bank of 146 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.