IAS पती विरोधात पोलिसांकडे गेली महिला IAS, म्हणाली - हनीमूनला समजलं तो....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 14:48 IST2022-02-02T14:47:07+5:302022-02-02T14:48:35+5:30
Uttar Pradesh : महिला आयएएसने आपल्या आयएएस पती विरोधात पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्या दोघांचं ५ मे १९९० रोज लग्न झालं होतं.

IAS पती विरोधात पोलिसांकडे गेली महिला IAS, म्हणाली - हनीमूनला समजलं तो....
एका आयएएस दाम्पत्याचा (IAS Couple) खाजगी वाद आता उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) लखनौच्या पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला. एक महिला आयएएसने आपल्या आयएएस पतीवर शारीरिक अक्षमता, मारहाण आणि लाखो रूपये हडपल्याचा आरोप करत त्याच्यावर केस दाखल केली आहे. तेच यासंबंधी पोलिसांनी सांगितलं की, ते महिला आयएएसकडून पतीवर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करत आहेत.
महिला आयएएसने आपल्या आयएएस पती विरोधात पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्या दोघांचं ५ मे १९९० रोज लग्न झालं होतं. ज्यानंतर हनीमून दरम्यान तिला समजलं की, तिचा पती शारीरिक रूपाने सक्षम नाही. पण उलट तोच तिच्यावर शारीरिक अक्षमतेचा आरोप लावत तिला मारहाण करू लागला होता. महिला आयएएसने आरोप लावला की, पतीच्या शारीरिक कमजोरीमुळे कधी तिचा परिवार पूर्ण होऊ शकला नाही. ती म्हणाली की, 'तिचा पती नेहमीच तिला एखाद्या दुसऱ्या महिलेकडे जाण्याचा धमकी देत होता आणि विरोध केल्यावर मारहाण करत होता'.
महिला आयएएसचा आरोप आहे की, काही महिन्यांनापूर्वी ती आणि तिची आई कोरोनाने संक्रमित झाली होती. ज्यानंतर स्थिती गंभीर झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. यादरम्यान तिच्या पतीने तिच्या बॅंक खात्यातून १९.५० लाख रूपये गायब केले. त्यासोबतच पतीने डॉक्टरला न दाखवता त्यांना चुकीची औषधं देण्याचा प्रयत्न केला.
महिलेने सांगितलं की, कोविड दरम्यान तिला ब्लॅक फंगससाऱखा गंभीर आजारही झाला होता. पण पतीने तिला याची माहिती दिली नाही. जेणेकरून वेळेवर माझ्यावर योग्य उपचार करता येऊ नये आणि समस्या अधिक गंभीर व्हावी. तेच लग्नाच्या इतक्या वर्षानंतर अशाप्रकारचे आरोप लावण्यावरून तिला प्रश्न विचारला तर तिने सांगितलं की, परिवार तुटण्यापासून वाचवण्यासाठी ती इतक्या वर्षांपासून त्रास सहन करत राहिली. पण आता प्रकरण हाताबाहेर गेलं आहे.
हे पण वाचा :
LOC, LAC आणि International Border मध्ये नेमका फरक तरी काय आहे?