विवाहित महिलेने भेटण्यास दिला नकार, माथेफिरू तरूणाने पाठवली Ambulance आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 09:27 AM2022-12-06T09:27:18+5:302022-12-06T09:29:06+5:30
UP Crime News : महिलेने नकार दिला तेव्हा त्याने महिलेच्या घरी एका हॉस्पिटलमधून अॅम्बुलन्स पाठवली. तेही हे सांगून की, महिलेच्या घरी डिलेव्हरी होणार आहे.
उत्तर प्रदेशच्या(Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) एका माथेफिरू प्रियकराने असं कृत्य केलं ज्यामुळे त्याला तुरूंगाची हवा खावी लागू शकते. हा तरूण एका विवाहित महिलेवर प्रेम करत होता. पण महिलेने जेव्हा त्याला नकार दिला तेव्हा तिला मिळवण्यासाठी त्याने नको नको ते केलं. तो महिलेला म्हणाला की, मला येऊन भेट. महिलेने नकार दिला तेव्हा त्याने महिलेच्या घरी एका हॉस्पिटलमधून अॅम्बुलन्स पाठवली. तेही हे सांगून की, महिलेच्या घरी डिलेव्हरी होणार आहे.
जेव्हा महिलेला याबाबत समजलं तेव्हा तिने आधी याकडे फार लक्ष दिलं नाही. तरूणाने पुन्हा तिला फोन केला आणि म्हणाला की, मला येऊन भेट नाही तर मी काहीही करू शकतो. महिलेने पुन्हा त्याला भेटण्यास नकार दिला. यावेळी तरूणीने पोलीस कंट्रोल रूमला फोन केला. त्याने पोलिसांना सांगितलं की, या महिलेने आत्महत्या केली आहे.
सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना समजलं की, तरूणाने खोटं सांगितलं. महिलेने तेव्हा पोलिसांना सांगितलं की, हा तरूण तिला गेल्या 2 महिन्यांपासून त्रास देत आहे. महिलेने सासरच्या लोकांसोबत मिळून पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांची टीम आता या तरूणाचा शोध घेत आहेत.
पीडित महिलेने सांगितलं की, ती विवाहित आहे. ती तिच्या सासरच्या लोकांसोबत राहते. तिला एक मुलही आहे. दोन महिन्याआधी तिला रजत मिश्रा नावाच्या तरूणाचा फोन आला होता. तो तिला म्हणाला की, त्याचं तिच्यावर प्रेम आहे. हे ऐकताच महिलेने त्याला खडसावलं आणि फोन कट केला. त्यानंतर हा तरूण महिलेला रोज फोन करत होता. महिलेने त्याला भेटण्यास नकार दिला तर त्याने तिच्या घरी अॅम्बुलन्स पाठवली.
हॉस्पिटलवाल्यांनी महिलेला सांगितलं की, आम्हाला कुणीतरी सूचना दिली की, तुमच्या घरी डिलेव्हरी होणार आहे. महिला हे ऐकताच हैराण झाली. तेव्हा तिला समजलं की, हे सगळं तो तरूण करत आहे. महिला पुन्हा रजतवर ओरडली. तिला वाटलं की, आता पुन्हा तो असं काही करणार नाही. पण तो काही शांत बसला नाही. त्याने पोलीस कंट्रोल रूममध्ये फोन केला आणि महिलेचा पत्ता देत सांगितलं की, या महिलेने आत्महत्या केली आहे.
नंतर त्याचा फोन स्वीच ऑफ लागत होता. तेव्हा महिलेने त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्याच्या नंबरच्या आधारावर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.