विवाहित महिला PUBG प्लेअरच्या पडली प्रेमात, घरदार सोडून पोहोचली प्रियकराच्या भेटीला आणि....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 11:46 AM2022-03-17T11:46:05+5:302022-03-17T11:46:28+5:30

Uttar Pradesh Crime News : येथील एक विवाहित महिला PUBG प्लेयरच्या प्रेमात अडकली आणि त्याला भेटण्यासाठी बिहारमध्ये पोहोचली. तक्रार मिळाल्यावर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं आणि पतीकडे सोपवलं.

UP : Married woman fell in love with pubg player leave home and reached Bihar | विवाहित महिला PUBG प्लेअरच्या पडली प्रेमात, घरदार सोडून पोहोचली प्रियकराच्या भेटीला आणि....

विवाहित महिला PUBG प्लेअरच्या पडली प्रेमात, घरदार सोडून पोहोचली प्रियकराच्या भेटीला आणि....

googlenewsNext

Uttar Pradesh Crime News :  देशातील मोठ्या प्रमाणात तरूणाई टाइमपाससाठी ऑनलाइन गेम्सचा आधार घेतात. पण त्यांचे दुष्परिणामही समोर येत आहेत. याद्वारे अनेकजण ऑनलाइन फ्रॉडमध्ये अडकतात तर कधी प्रेमात पडून फसवणुकीचे शिकार होतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशाच्या महाराजगंज जिल्ह्यातून समोर आली आहे. येथील एक विवाहित महिला PUBG प्लेयरच्या प्रेमात अडकली आणि त्याला भेटण्यासाठी बिहारमध्ये पोहोचली. तक्रार मिळाल्यावर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं आणि पतीकडे सोपवलं.

पोलिसांनुसार, महाराजगंजच्या बडहरा बरईपारमधील आहे. इथे राहणारी एक महिला नेहमीच रिकाम्या वेळेत PUBG गेम खेळत होती. या दरम्यान ती बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये राहणाऱ्या एका PUBG प्लेअरच्या प्रेमात पडली. ३ मार्चच्या रात्री अचानक महिला घरातून बेपत्ता झाली. पतीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. 

महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल होताच पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. चौकशीतून समोर आलं की, महिलेला PUBG खेळण्याची सवय होती. यादरम्यान ती बिहारच्या मुजफ्फरपूरच्या एका तरूणासोबत बोलू लागली होती. दोघांची मैत्री प्रेमात बदलली आणि महिला घर सोडून तरूणाला भेटण्यासाठी गेली. महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा शोध घेतला आणि तिला पतीकडे सोपवलं. पोलिसांनुसार, महिला सुष्मिता सरकार आणि तिचा पती मुळचे बंगालचे राहणारे आहेत. बऱ्याच महिन्यांपासून ते यूपीच्या महाराजगंजमध्ये राहतात.
 

Web Title: UP : Married woman fell in love with pubg player leave home and reached Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.