ट्रॅफिक पोलिसांनी पकडला होता ट्रक, ड्रायव्हरच्या दोन्ही बायकांनी केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 06:28 PM2022-09-05T18:28:06+5:302022-09-05T18:28:39+5:30

Crime News : ही घटना मिमलाना गावातील आहे. इथे जावेद नावाच्या एका व्यक्तीला अफसाना आणि हिना नावाच्या दोन बायका होत्या.

UP Muzaffarnagar husband was about to eat poison before that two wives gave their lives | ट्रॅफिक पोलिसांनी पकडला होता ट्रक, ड्रायव्हरच्या दोन्ही बायकांनी केली आत्महत्या

ट्रॅफिक पोलिसांनी पकडला होता ट्रक, ड्रायव्हरच्या दोन्ही बायकांनी केली आत्महत्या

Next

Crime News : उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये रविवारी एका व्यक्तीच्या दोन पत्नींनी आत्महत्या केली. घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले. त्यानंतर चौकशी सुरू केली. 

ही घटना मिमलाना गावातील आहे. इथे जावेद नावाच्या एका व्यक्तीला अफसाना आणि हिना नावाच्या दोन बायका होत्या. दोघींनीही विष पिऊन आपलं जीवन संपवलं. पती जावेदनुसार, कामाच्या समस्येवरून तो स्वत: आत्महत्या करणार होता. पण त्याआधी त्याच्या दोन्ही बायकांनी विष पिऊन आत्महत्या केली.

पीडित पती जावेदने सांगितलं की, दोन्ही माझ्या पत्नी होत्या. त्याच्यानुसार, त्याची गाडी पोलिसांनी पकडली होती. जवळपास त्याला 70 हजार रूपयांचं चालान ठोकण्यात आलं. त्यातील त्याने 12 हजार रूपये जमा केले होते. बाकी पैशांची जमवा जमव होत नव्हती. ज्यामुळे रागाच्या भरात आपल्या बायकांसमोर तो म्हणाला होता की, अशा जगण्यापेक्षा मी मेलेलो बरा, गाडीही सोडत नाहीये.

जावेद म्हणाला की, माझ्याआधी त्यांनीच विष खाल्लं. एका पत्नीचं नाव अफसाना तर दुसरीचं नवा हिना होतं. अफसानासोबत लग्न करून 15 वर्ष झाली होती तर हिनासोबत लग्नाला चार वर्षे झाली होती. जावेद म्हणाला की, सकाळी 8 वाजता त्यांनी विष खाल्लं. 

याप्रकरणी एसपी सिटी अर्पित विजयवर्गीय यांनी सांगितलं की, आतापर्यंत जी माहिती समोर आली त्यानुसार, जावेदच्या दोन्ही बायकांमध्ये कौटुंबिक वाद सुरू होता. ज्यामुळे दोघींनी विष खाऊन आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमला पाठवले आहेत. पुढील कारवाई सुरू आहे.

Web Title: UP Muzaffarnagar husband was about to eat poison before that two wives gave their lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.