मदरशातून मुलींना उचलून रात्रभर बलात्कार! अतिक-अश्रफनं केले होते भयानक कांड; लिस्ट वाचून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 01:07 PM2023-04-18T13:07:15+5:302023-04-18T13:08:09+5:30
गेल्या 15 एप्रिलच्या रात्री प्रयागराजमधील एका रुग्णालयाच्या परिसरात तीन जणांनी या दोघांचाही गोळ्या झाडून खात्मा केला.
माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्यासंदर्भात आता रोजच्या रोज नवनवे खुलासे होऊ लागले आहेत. खरे तर या दोन्ही भावांच्या मृत्यूनंतर त्यांची दहशत संपुष्टात आली असेल, मात्र त्यांच्या गुन्ह्यांची कुंडली पाहिल्यास, त्यांनी अल्पसंख्याक समाजातील लोकांवरही प्रचंड अत्याचार केल्याचे लक्षात येते. गेल्या 15 एप्रिलच्या रात्री प्रयागराजमधील एका रुग्णालयाच्या परिसरात तीन जणांनी या दोघांचाही गोळ्या झाडून खात्मा केला.
उत्तर प्रदेशपोलिसांच्या रेकॉर्डनुसार, या दोन्ही भावांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, फसवणूक, धमकावणे आणि जमीन बळकावणे असे शेकडो गुन्हे दाखल आहेत. एवढेच नाही तर त्यांनी त्रास दिलेल्यांची यादीही मोठी आहे आणि यात बहुतांश पीडीत अल्पसंख्याक समाजातील आहेत.
20 पैकी 13 मोठ्या प्रकरणांमध्ये मुस्लिम समाजातील लोक पीडित -
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, "या दोघांवर 20 मोठ्या गुन्ह्यांची नोंद आहे. अहमद बंधूंनी 13 प्रकरणांत अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य केले होते. अतिकचा भाऊ अश्रफ, हा एका मदरशातून दोन अल्पवयीन मुस्लिम मुलींचे बंदुकीच्या धाकाने अपहरण करून त्यांच्यावर रात्रभर वारंवार बलात्कार करण्याच्या गुन्ह्यातही सामील होता. संबंधित पीडित मुलींना दुसऱ्या दिवशी सकाळी मदरशाच्या गेटसमोर फेकण्यात आले होते."
जमिनी बळकावण्यासाठी नातलगांच्याच घरावर चालवला बुलडोजर -
अतीकच्या दहशतीचे जिवंत उदाहरण म्हणजे प्रयागराजमधील कसारी मसारीचा जिशान उर्फ जानू आणि अतिकचा मेहुणा इम्रान जई याचा एक भाऊ. अतिकने जिशानची जमीन ताब्यात घेण्यासाठी त्याच्या घरावर बुलडोझर चालवला होता. याशिवाय, जिशानच्या म्हणण्यानुसार, अतिकच्या गुंडांनी त्याच्यावर हल्लाही केला होता आणि त्याला पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यासंदर्भात धमकीही दिली होती."
अतिकने त्याच्या जवळच्या नगरसेवकाची करवली होती हत्या -
अतिक अहमदवर नगरसेवक अशफाक कुन्नूच्या हत्येचाही आरोप होता. एवढेच नाही, तर नगरसेवक नैसनवर गोळीबार केल्याचा आरोपही त्याच्यावर होता. नैसनने अतिकविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली होती. यामुळे दोघांमधील मतभेद वाढले होते. पोलिसांनी म्हटल्यानुसार, अतिकने 2001 मध्ये चकियामध्ये कथितरित्या गोळ्या झाडून हत्या केली होती. याशिवाय अतिकवर 2003 मध्ये भाजप नेता अश्रफचीही कथितरित्या हत्या केल्याचाही आरोप होता.