'या' गॅंगस्टरला म्हटलं जातं पूर्वांचलचा सर्वात मोठा डॉन, दाऊद इब्राहिमचा होता हा गुरू!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 11:57 AM2022-01-21T11:57:02+5:302022-01-21T11:59:01+5:30

UP Crime World : यूपीमध्ये होत असलेल्या कोणत्याही निवडणुकीत बाबाचा हस्तक्षेप मोठा असतो. खासकरून पूर्वांचलमध्ये तर काही जागांवर त्यांच्या थेट प्रभाव मानला जातो.

UP Purvanchal bahubali mafia don Subhash Thakur impact on vidhan sabha election | 'या' गॅंगस्टरला म्हटलं जातं पूर्वांचलचा सर्वात मोठा डॉन, दाऊद इब्राहिमचा होता हा गुरू!

'या' गॅंगस्टरला म्हटलं जातं पूर्वांचलचा सर्वात मोठा डॉन, दाऊद इब्राहिमचा होता हा गुरू!

googlenewsNext

UP Crime World : यूपीच्या पूर्वांचलमध्ये नेहमीच बाहुबलींची चर्चा होत असते. तसे तर पूर्वांचलमध्ये अनेक माफिया-गॅंगस्टर आहेत. पण एका नवा असं आहे ज्याला लोक यूपीचा सर्वात मोठा माफिया डॉन म्हणतात. त्याचं नाव आहे बाबा उर्फ सुभाष ठाकूर (Don Subhash Thakur), तो सध्या बनारसच्या तुरूंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. पण त्याच्या राजकारणातलं वजन भरपूर आहे.

असं सांगितलं जातं की, यूपीमध्ये होत असलेल्या कोणत्याही निवडणुकीत (UP Assembly Election) बाबाचा हस्तक्षेप मोठा असतो. खासकरून पूर्वांचलमध्ये तर काही जागांवर त्यांच्या थेट प्रभाव मानला जातो. सूत्रांनुसार, या भागातील अनेक छोटे-मोठे नेते सुभाष ठाकूरकडून विजयानंतर आशीर्वाद घेतात. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवल्यानंतर बाबा जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. 

बाबाचा गुन्हेगारी विश्वातील प्रवास

नव्या कामाच्या शोधात सुभाष ठाकूर उर्फ बाबाने मायानगरी मुंबईत पाय ठेवला होता. तेव्हाच तो गुन्हे विश्वात शिरला. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. एकापाठी एक गंभीर गुन्ह्यांमध्ये तो सामिल होत राहिला. फार कमी गुन्हेगारी विश्वात त्याचं नाव प्रसिद्ध झालं. त्याच्या नावाची दहशत मुंबईत दिसू लागली होती. तेथील बिल्डर आणि उद्योगपतींवर त्याची पकड होती. एकेकाळी त्याचा व्यापार यूपीपासून ते मुंबईपर्यंत पसरला होता.

बाबाचा शिष्य दाऊद इब्राहिम

ज्यावेळी बाबाचं मुंबईतील गुन्हेगारी विश्वात दबदबा होता तेव्हा मुंबईतील कॉन्टेबलचा मुलगा दाऊद इब्राहिम कासकर गुन्हे विश्वात एन्ट्री घेत होता. पण या विश्वात त्याला एका गुरूची गरज होती. त्यामुळे तो सुभाष ठाकूरच्या दारात पोहोचला. बाबाने त्याला शिष्य बनवलं. त्याला अनेक गोष्टी शिकवल्या. तिथूनच दाऊद गुन्हेगारी विश्वातील बारकावे शिकला. नंतर तो एक कुख्यात गॅंगस्टर बनला आणि नंतर मुंबईतील सर्वात मोठा माफिया डॉन बनला. 

मुंबईतील धमाक्यांनंतर वेगळे  झाले मार्ग

सर्वांनाच माहीत होतं की, कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन इब्राहिमचा गुरू सुभाष ठाकूर उर्फ बाबा आहे. दाऊदही बाबाला फार मानत होता. पण काही वर्षांनी दोघांचं नातं तुटलं. ज्याचं कारण होतं मुंबईतील १९९२ मध्ये झालेला बॉम्ब ब्लास्ट. तेव्हापासूनच सुभाष ठाकूर आणि दाऊद इब्राहिम नेहमीसाठी वेगळे झाले.

कुणालाही वैर घ्यायचं नाही

पूर्वांचलमध्ये गुन्हेगारी विश्वातून निघून राजकारणात येणाऱ्या बृजेश सिंहला सुभाष ठाकूरचा आधार मिळाला. सुभाष ठाकूरचा हात डोक्यावर आल्याने बृजेश सिंहला फायदा झाला होता. दोघांनी सोबत मिळून काम केलं. बाहुबली नेता मुख्तार अंसारीपासून ते अतीक अहमदपर्यंत कुणालाही सुभाष ठाकूरसोबत वैर घ्यायचं नव्हतं. 

बाबाचं सर्वात मोठं कांड

सुभाष ठाकूर, दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन मिळून मुंबईवर राज्य करत होते. त्यांची दुश्मनी अरूण गवळी गॅंगसोबत झाली होती. यादरम्यान गवळीने दाऊदला मोठा धक्का दिला. त्याच्या शूटरने दाऊद इब्राहिमचा भाओजी इस्माइल पारकरची हत्या केली होती. यात पहिल्यांदा एके४७ रायफल आणि ९ एमएम पिस्तुलचा वापर झाला होता. बदला घेण्यासाठी त्याने सुभाष ठाकूर आणि छोटा राजनला कामी लावलं होतं. त्यांनी मुंबईतील जेजे हॉस्पिटलमध्ये गवळीचा शूटर शैलेशची हत्या केली होती.
 

Web Title: UP Purvanchal bahubali mafia don Subhash Thakur impact on vidhan sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.