भाजप नेत्याचा आपल्याच कुटुंबावर गोळीबार; तीन मुलांचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 16:38 IST2025-03-22T16:37:21+5:302025-03-22T16:38:02+5:30
या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केले.

भाजप नेत्याचा आपल्याच कुटुंबावर गोळीबार; तीन मुलांचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी
UP Crime : उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. येथील एका स्थानिक भाजप नेत्याने पत्नी आणि तीन मुलांवर गोळ्या झाडल्या. या घटनेत तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी आहे. माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि सर्वांना रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले, तर पत्नीवर पोलिसांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
योगेश रोहिला असे आरोपी भाजप नेत्याचे नाव असून, तो सहारनपूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य आहे. तो अनेक दिवसांपासून मानसिक आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या घटनेमागचे कोणतेही ठोस कारण अद्याप पोलिसांनी दिलेले नाही. या घटनेत शिवांश (4), देवांश (7) आणि श्रद्धा (8) यांचा मृत्यू झाला, तर पत्नी नेहा (32) गंभीर जखमी आहे.
एसपी ग्रामीण तात्काळ फॉरेन्सिक टीम आणि पोलिस स्टेशन फोर्ससह घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेनंतर योगेश रोहिल्ला याने स्वतः शेजारच्या लोकांना घटनेची माहिती दिली. हे ऐकून शेजाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आणि त्यांनीच पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून भाजप नेत्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.