डेटिंग साइटवर पडली प्रेमात, हृदयासोबत १२ लाख रूपये दिले; तरूण फोन बंद करून फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 11:52 AM2022-02-18T11:52:14+5:302022-02-18T11:53:01+5:30
UP Crime News : तरूणीकडून पैसे घेतल्यानंतर तरूण त्याच्या फोन बंद करून फरार झाला. तरूणीच्या तक्रारीवर पोलिसांनी तरूणाचा शोध सुरू केला आहे.
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गाझियाबादमध्ये (Gaziabad) एका तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून १२ लाख रूपये लुटल्याची घटना समोर आली आहे. तरूणीकडून पैसे घेतल्यानंतर तरूण त्याच्या फोन बंद करून फरार झाला. तरूणीच्या तक्रारीवर पोलिसांनी तरूणाचा शोध सुरू केला आहे.
पीडित तरूणी गाझियाबादची राहणारी आहे. तिने पोलिसांना सांगितलं की, एका डेटिंग साइटवर तिची एका तरूणासोबत ओळख जाली होती. मैत्री कधी प्रेमात बदलली तिला समजलंच नाही. दोघांनी एकमेकांना त्यांचे नंबर्स दिले. फोन आणि इन्स्टाग्रामवर दोघे ३ महिन्यांपर्यंत संपर्कात होते. तरूणाने तिला अनेक आश्वासने दिली आणि काही पैशांची मागणी केली. तरूणीने त्याला पैसे दिले. तरूणीने ना त्याचा चेहरा पाहिला होता ना त्याला कधी भेटली होती.
कधी ऑफिसचं काम तर कधी वेगळं काही कारण देत तो तिला पैशांची मागणी करत होता. थोडे थोडे करत तरूणीने त्याला तब्बल १२ लाख रूपये दिले. पैसे दिल्यानंतर तरूणीने जेव्हा त्याला भेटायला येण्यास सांगितलं तेव्हा त्याने अचानक तिच्याशी बोलणं बंद केलं. तेव्हा तरूणीला फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. पीडित तरूणी पोलिसांत तक्रार केली. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
प्रिन्सिपल-प्रोफेसर बनून ६०० लोकांना लावला चूना
याआधी ३ फेब्रुवारी २०२२ ला गाझियाबाद पोलिसांनी लोन आणि क्रेडिट कार्डच्या नावावर लोकांची फसवणूक करणाऱ्या गॅंगचा भांडाफोड केला. गाझियाबाद सायबर सेलने खुलासा करत तीन आरोपींना अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी शिक्षक होते आणि हापूडमध्ये शाळा चालवत होते. कोरोना काळात शाळा बंद असल्याने तिघांनी हा धंदा सुरू केला होता. यादरम्यान १३ महिन्यात ६०० पेक्षा जास्त लोकांची फसवणूक केली.