जॉब पोर्टलवर रिझ्युम अपलोड करणं युवकाला पडलं महागात, 16.64 लाखांची फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 01:45 PM2019-09-29T13:45:16+5:302019-09-29T13:46:02+5:30

पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Uploading Resume On Job Portal Become Expensive, Fraud Of Rs16.64 Lakh | जॉब पोर्टलवर रिझ्युम अपलोड करणं युवकाला पडलं महागात, 16.64 लाखांची फसवणूक 

जॉब पोर्टलवर रिझ्युम अपलोड करणं युवकाला पडलं महागात, 16.64 लाखांची फसवणूक 

Next

नोएडा : एक तरुणाला जॉब पोर्टलवर आपला रिझ्युम अपलोड करणे महागात पडले आहे. सायबर क्राइम करणाऱ्यांकडून नकली जॉब पोर्टल तयार करून तरुणाची 16.64 लाख रुपयांची फसवणूक केली.

या तरुणाने www.nokri.com वर  गेल्या वर्षी जुलै महिन्यात रिझ्युम अपलोड केला होता. त्यानंतर सायबर क्राइम करणाऱ्या भामट्यांनी तरुणाला कॅनडातील काही नामांकित कंपन्यांची बनावट ऑफर लेटर पाठवून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी नोएडामधील सेक्टर 39 पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

नोएडामधील सेक्टर 45 मध्ये सदरपूर येथील हा तरुण राहत असून त्याचे नाव चंदन कुमार आहे. त्याने सांगितले की, एक ऑगस्टला पहिला कॉल आला होता. त्यावेळी अनुप गुप्ता नामक व्यक्तीने कॉल करून जॉब पोर्टलचा कर्मचारी असल्याचे सांगितले होते. आयटी कंपनीसाठी कॉन्फ्रेंस कॉलवर इंटरव्यू सुद्धा घेण्यात आला होता. त्यानंतर ऑफर लेटर पाठवून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली 1 लाख रुपये घेण्यात आले. 

फसवणूक एवढ्यावरच थांबली नाही, तर राजेंद्र सिंह शेखावत नाव असलेल्या एका व्यक्तीने स्वत: एचआरमधील असल्याचे सांगून 25 हजार रुपये ट्रान्सफर करायला सांगितले. यानंतर आणखी 70 हजार रुपये मागितले. प्रकरणा इथेच थांबले नाही, तर कॅनडात जॉब लावण्याच्या नावाखाली पुन्हा 15 लाख रुपये उकळण्यात आले. चंदन कुमार याने सुभाष आणि आदित्य यांच्या खात्यात पैसे भरले होते. त्यानंतर सर्वांनी आपले नंबर बंद करुन ठेवले. दरम्यान, याप्रकरणी पोलीस ठाण्यात चंदन कुमार याने गुन्हा दाखल केला असून पोली अधिकारी नीरज मलिक या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

Web Title: Uploading Resume On Job Portal Become Expensive, Fraud Of Rs16.64 Lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.