उरणमध्ये पोलिसांनी कारवाई करत 1 लाख 20 हजार किंमतीचा सहा किलो गांजा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 08:16 PM2021-07-16T20:16:03+5:302021-07-16T20:16:44+5:30

Drug Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (१५) रात्री तीन इसम रिक्शांनी अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर खबऱ्याकडून उरण पोलिसांना मिळाली होती.

In Uran, police seized 6 kg of cannabis worth Rs 1 lakh 20,000 | उरणमध्ये पोलिसांनी कारवाई करत 1 लाख 20 हजार किंमतीचा सहा किलो गांजा जप्त

उरणमध्ये पोलिसांनी कारवाई करत 1 लाख 20 हजार किंमतीचा सहा किलो गांजा जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देरिक्षा चालक राहुल धुमाळ हा अंधाराचा फायदा घेऊन आणि पोलिसांना चकवा देत पळून जाण्यात यशस्वी ठरला. याप्रकरणी उरण पोलिस अधिक तपास करत आहेत.

मधुकर ठाकूर

उरण : उरणमध्ये पोलिसांनी कारवाई करत एक लाख २० हजार किंमतीचा सहा किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला असल्याची माहिती उरण पोलिसांनी दिली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (१५) रात्री तीन इसम रिक्शांनी अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर खबऱ्याकडून उरण पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर वपोनि रविंद्र बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चार फाटा येथे गुप्तपणे सापळा लावला होता. गुरुवारी रात्रीच्या अंधारात एक संशयित रिक्षा येताना दिसली.पोलिसांनी रिक्षा अडवून तपासणी केली असता रिक्षातील संशयित तीन संशयित इसमांकडे एक लाख २० हजार किंमतीचा सहा किलो गांजा सापडला. पोलिसांनी गांजा हस्तगत करुन विशाल  पाथरे,प्रीतम नायर या दोन इसमांना अटक केली आहे.दोघेही डाऊर नगर - उरण येथील रहिवासी आहेत. मात्र, रिक्षा चालक राहुल धुमाळ हा अंधाराचा फायदा घेऊन आणि पोलिसांना चकवा देत पळून जाण्यात यशस्वी ठरला. याप्रकरणी उरण पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: In Uran, police seized 6 kg of cannabis worth Rs 1 lakh 20,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.